एक्स्प्लोर

भाजप आमदाराच्या मालकीची कार परिवहन मंत्र्याच्या नावे; आरटीओतील भोंगळ प्रकार उघडकीस

Jalgaon RTO : विभागीय परिवहन कार्यालयातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Jalgaon RTO :  विभागीय परिवहन कार्यालयातील अनागोंदी कारभारापासूनचे ते दलालांच्या विळख्यांचे अनेक किस्से चर्चेत असतात. त्यातील काही प्रकार समोरही येतात. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार संजय सावकारे यांच्या कारची मालकी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावे करण्यात आली आहे.  जळगाव आरटीओत हा प्रकार घडला असून कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही तांत्रिक चूक आहे की घोटाळा आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

आमदार संजय सावकारने यांनीदेखील या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नाही. आपली कार परस्पर अनिल परब यांच्या नावे कशी लागली याचेच आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत आरटीओ कार्यालयात चौकशी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. एखाद्या आमदाराची गाडी अशा प्रकारे परस्पर दुसऱ्याच्या नावे होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असाही संतप्त सवाल त्यांनी केला. हा प्रकार म्हणजे आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जळगाव आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परिवहन अधिकारी शाम लोही यांनी म्हटले की, संजय सावकारे यांची गाडी परिवहन मंत्री यांच्या नावे परस्पर करण्यात आली असल्याची ही सत्य बाब आहे. या प्रकरणी प्राथमिक तपासात ऑनलाईन सिस्टममधील काही त्रुटींचा एका अज्ञात व्यक्तीने दुरुपयोग करून हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक केला असल्याचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. एखादे वाहन दुसऱ्याच्या नावे करताना काळजी घ्यायला हवी असेही त्यांनी म्हटले. या घटनेबाबत आम्हीही  सखोल चौकशी करीत आहोत. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी दोषींवर चौकशी अंती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget