Rohit Pawar : भाजपसाठी शिंदे-दादांची गरज संपली, कुबड्या चुलीत घातल्या जातील; रोहित पवारांची अजितदादा-शिंदेंवर टीका
Rohit Pawar On Mahayuti : मतदार यादीतील घोळाचा फटका शिंदे-दादांना बसणार असून ते त्यांच्या अवघड जागेचं दुखणं बनलं आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा (Bogus Voters List) फटका आपल्याला बसेल अशी भीती महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला आहे. त्यामुळेच त्यांच्या आमदारांची खदखद बाहेर येत असल्याची टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. भाजपच्या लेखी मित्रपक्षांची उपयुक्तता संपली असून त्या कुबड्या आता अडकवल्या जातील की चुलीत घातल्या जातील हे पाहावं लागेल असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. बोगस मतदार यादीचा फटका आपल्याला बसेल अशी भीती या दोन्ही पक्षांना असल्याचं रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar On Election : मतदार यादीतील घोळ अवघड जागेचं दुखणं
विधानसभेला गारगार वाटणाऱ्या मतदारयादीचा घोळ आता या मित्रपक्षांच्या अवघड जागेचं दुखणं झाल्याची टीका रोहित पवारांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती नसल्याने या बोगस मतदार यादीचा फटका आपल्याला बसेल अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे दुबार मतदार रोखण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला.
Rohit Pawar On BJP : भाजप कुबड्या काढून फेकून देणार
मित्रपक्षांच्या प्रत्येक गोष्टीत भाजप हस्तक्षेप करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. त्यामुळेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांना दोन-दोन वेळी मिटिंग घ्यावा लागल्याचं ते म्हणाले. भाजपच्या दृष्टीने आता मित्रपक्षांची उपयुक्तता संपल्याचा दावाही रोहित पवारांनी केला.
Rohit Pawar Twitter Post : काय म्हणाले रोहित पवार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका बसून गेम होईल या भीतीने सत्तेतील इतर दोन मित्रपक्ष प्रचंड चिंतेत पडले आहेत. या चिंतेतूनच अनेक आमदारांची खदखद आता समोर येत आहे. कालचा आमचा मोर्चा बघून तर सत्ताधारी इतर दोन पक्षातील काहींचे फोन आले असून दुबार तसेच बोगस मतदार रोखण्यासंदर्भात चर्चा केली. विधानसभेला गार गार वाटणारा मतदारयाद्यांचा घोळ आता मात्र अवघड जागेचं दुखणं झालंय असंच म्हणावे लागेल.
एकंदरीत महायुतीतच प्रचंड धुसफूस आहे. ही धुसफूस एवढी वाढलीय की MOA च्या निवडणुकीसाठी सुद्धा अजित दादांना दोन-दोनदा बैठका घ्याव्या लागत आहेत. सर्वच ठिकाणी भाजपा हस्तक्षेप करत असून भाजपसाठी दोन्ही मित्रपक्षांची उपयुक्तता संपल्याचीच ही चिन्हे दिसत असून अमित शाह साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुबड्या काढून फेकण्याची ही नांदी म्हणावी लागेल. आता या कुबड्या अडकवल्या जातील की चुलीत पेटवल्या जातील हेच बघणे महत्वाचे ठरेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका बसून गेम होईल या भीतीने सत्तेतील इतर दोन मित्रपक्ष प्रचंड चिंतेत पडले आहेत. या चिंतेतूनच अनेक आमदारांची खदखद आता समोर येत आहे. कालचा आमचा मोर्चा बघून तर सत्ताधारी इतर दोन पक्षातील काहींचे फोन आले…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 2, 2025
ही बातमी वाचा:



















