एक्स्प्लोर

निलेश राणेंचे भाजपवर आरोप, रोहित पवारांनी केलं अभिनंदन, म्हणाले, भाजपचे पाय चिखलाने माखलेले

मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख रुपये मिळाल्यावरुन शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे. यानंतर रोहित पवारांनीही भाजपवर टीका केलीय.

Rohit Pawar on BJP : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख रुपये मिळाल्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे. यावरुन चांगेलच राजकीय वातानरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आता याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश राणे यांचे अभिनंदन करत भापवर जोरदार प्रहार केला आहे. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं अशी टीका रोहित पवारांनी केलीय. 

नेमकं प्रकरण काय?

मालवणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. विजय किंजवडेकर असं त्यांच नाव आहे.  त्यांच्या घरी हे पैसे काय करतात, हे सगळं निवडणूक यंत्रणेला सांगावे लागेल असे निलेश राणे म्हणाले. काल रवींद्र चव्हाण मालवण मध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे असे म्हणत राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का?. मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत. त्या शोधून योग्य ती कारवाई करावी. 25 ते 50 लाख रुपये भरून ठेवलेली मालवण मध्ये 8 ते 10 घर असल्याचा निलेश राणेंनी आरोप केला आहे. वातावरण गढूळ करून शहराचा असा प्रकारे विकास करणार का?. उद्या निवडणूक आयोगाकडे आणि पोलिस कार्यालयात जाऊन काय कारवाई केली याचा आढावा घेणार. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार. पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा दावा देखील निलेश राणेंनी केला. भाजप जिंकली तर लोकांची सेवा करायला नगरपरिषदेत जाणार नाहीत, नगरपरिषदेत लुटायला जाणार असे राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी मिळाले 25 लाख, निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, भाजप जिंकली तर नगरपरिषद लुटणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kishor Masal Baramati Crime News: घरात घुसला, अश्लील मागण्या केल्या; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
घरात घुसला, अश्लील मागण्या केल्या; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget