एक्स्प्लोर
नागपुरात भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा

नागपूर : कन्हानमध्ये भरदिवसा दरोडा पडला आहे. अमित ज्वेलर्समधून चार दरोडेखोरांनी 20 लाख रुपयांचं सोनं आणि रोकड लुटली. ज्वेलर्सचे मालक अमित गुप्ता यांनी दरोडेखोरांना रोखण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या ज्वेलर्समधून आणि दोन पळून जातना झाडल्या. अमित गुप्ता यांच्या पायालाही एक गोळी लागली. अमित गुप्तांवर कामटी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे. दुपारी दोन वाजता ही घटना घडली. घटनेबाबत माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चारही दरोडेखोर फरार असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
आणखी वाचा























