एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोपीचंद पडळकर यांना जोड्यांनी मारणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारे गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. जत अथवा खानापूर मतदारसंघातून गोपीचंद पडळकर निवडणुकीला उभे राहणार असल्याचं बोललं जात आहे.
जालना : वंचित बहुजन आघाडीशी गद्दारी केल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर यांना जोडयांनी मारणाऱ्याला 50 हजाराचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. जालना येथे जय भीम सेनेकडून हे बक्षीस जाहीर केले आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यभरात गोपीचंद पडळकर प्रसिद्ध आहेत.
वंचित बहुजन आघाडीशी गद्दारी केल्याचा आरोप करत, पक्षाचा राजीनामा देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना जोड्यांनी मारणाऱ्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. जालना येथे जय भीम सेनेकडून या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. आज जालना येथे जय भीम सेना संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान या आंदोलनानंतर संघटनेनं गोपीचंद पडळकर भाजपमध्ये गेल्यावर जिथे असतील तिथे त्यांना जोडेयांनी मारण्याचा इशारा देखील दिला आहे.
नुकतेच धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री धनगर समाजाच्या आरक्षणबाबत सकारात्मक भूमिका घेत आहेत, असे सांगत त्यांनी भाजपात प्रवेश केला. आपले प्रकाश आंबेडकर यांच्याशी कसलेही वाद झालेले नाहीत असेही त्यांनी सांगितले होते.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारे गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. जत अथवा खानापूर मतदारसंघातून गोपीचंद पडळकर निवडणुकीला उभे राहणार असल्याचं बोललं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement