एक्स्प्लोर
परतीच्या प्रवासात तेजस एक्स्प्रेसमध्ये घाणीचं साम्राज्य
रत्नागिरी/मुंबई: अत्याधुनिक सेवेनं सज्ज असलेल्या तेजस एक्स्प्रेसनं परतीच्या प्रवासात मात्र प्रवाशांची घोर निराशा केली. मुंबई सीएसटीहून गोव्याकडे करमालीला थाटामाटात गेलेली तेजस एक्सप्रेस येताना मात्र दृष्ट लागल्यासारखी आली.
परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काल जेव्हा तेजस करमाळी स्थानकावरून निघाली, तेव्हा ट्रेनमध्ये स्वच्छता नव्हती. तसंच ट्रेनमधील टॉयलेट्स साफ न केल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली असं प्रवाशांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे एका कुटुंबाला स्वयंचलित दरवाज्यांमुळे त्रास सहन करावा लागला.
त्यामुळे मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या तेजस एक्सप्रेसचा मनसोक्त आनंद लुटण्यापूर्वीच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
त्यांचा मुलगा रत्नागिरी स्टेशनला उतरला, मात्र त्याचवेळी गाडीचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे त्याला गाडीत चढताच आलं नाही. अखेर त्याचे कुटुंब मुंबईला पुढे निघून आले.
त्यामुळे स्टेशन आल्याची आणि दरवाजे बंद होणार असल्याची घोषणा करावी अशी सूचना प्रवशांनी रेल्वे प्रशासनला दिल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement