एक्स्प्लोर

'राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर, महाराष्ट्र पोलीस दलाला सात शौर्य, चार राष्ट्रपती पोलीस पदकांसह 51 पदके

Republic day 2022 : महाराष्ट्र पोलीस दलाने सात शौर्य पोलीस पदक, चार विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि 40 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे.

मुंबई :  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने सात शौर्य पोलीस पदक, चार विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि 40 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिका-यांना 'अग्निशमन सेवा पदक' जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. 

महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांची कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यानी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 

अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असा 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक' मरणोत्तर जाहीर झाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. 

महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक' जाहीर झाले आहे. मुख्य अग्निशमन  अधिकारी  प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक' जाहीर झाले आहे. याशिवाय  उत्कृष्ट सेवेसाठी  मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना 'अग्निशमन सेवा पदक' जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Republic Day 2022: भारतीय संविधानाची मूळ प्रत कुठे आहे? जाणून घ्या, प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या खास गोष्टी 

Republic Day 2022: यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्याविना, कोरोनामुळे केंद्राचा निर्णय

Republic Day 2022 Stickers : प्रजासत्ताक दिनादिवशी शुभेच्छा देण्यासाठी असे डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टीकर्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Embed widget