(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Republic Day 2022: यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्याविना, कोरोनामुळे केंद्राचा निर्णय
Republic Day News: दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाली विदेशी पाहुणा आमंत्रित केला जातो. पण यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही पाहुण्याला आमंत्रण देण्यात आलं नाही.
नवी दिल्ली : दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो. पण या वर्षीच्या कार्यक्रमावर कोरोनाच्या प्रादुर्भावाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिनही प्रमुख पाहुण्याविनाच पार पडणार आहे. या वर्षी कोणत्याही विदेशी राष्ट्राध्यक्षाला किंवा पंतप्रधानाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमालाही कोणत्याही विदेशी प्रमुख पाहुण्याला आमंत्रित करण्यात आलं नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वर्षीच्या राजपथावरील कार्यक्रमामध्ये पाच ते आठ हजार लोकांनाच प्रवेश मिळणार आहे. कोरोना नियमांच्या प्रोटोकॉलमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षाच्या कार्यक्रमाला 25 हजार प्रेक्षक उपस्थित होते.
Due to global COVID-19 situation, it was decided not to have a foreign head of state or head of government as R-Day chief guest: MEA
— Press Trust of India (@PTI_News) January 14, 2021
सन 1950 सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पहिल्यांदा विदेशी पाहुण्यांना बोलावण्यात आलं होतं. त्या वेळच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो होते. गेल्या वर्षी ब्रिटनचे बोरिस जॉन्सन हे प्रमुख पाहुणे होते. पण गेल्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ते येऊ शकले नव्हते.
परेडची वेळ काय?
यंदा परेड ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. संपूर्ण परेड 90 मिनिटांची असते. दरवर्षी 26 जानेवारीला सकाळी ठिक 10 वाजता राजपथावर परेड सुरु होते. परंतु, कोरोनामुळे यावेळी ही परेड 10:30 वाजता सुरू होणार आहे. साधारण 8 किलोमीटर अंतराची ही परेड असणार आहे. रायसीना हिलवरून सुरु झालेली परेड राजपथ, इंडिया गेटच्या दिशेने फिरून लाल किल्ल्यावर संपते. परेडच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडिया गेटवर शहीद जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत.
महत्त्वाची बातमी :
Republic Day Parade 2022 Live : कधी अन् कुठे पाहाल प्रजासत्ताक दिनाचा लाईव्ह कार्यक्रम!