एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Security: मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, तर शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ; शिंदे गटाच्या 10 खासदार, 41 आमदारांना वाय प्लस सुरक्षा

राज्यांतील परिस्थिती पाहता शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवणे गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतरच या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

मुंबई :  राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत शहकटशहाचं राजकारण सुरु असताना शिंदे सरकारनं दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षेत कपात (Security)  केली तर काहींची सुरक्षा काढून घेतली. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच सरकारने शिंदे गटाला सुरक्षाकवच दिलंय. शिंदे गटाचे (knath Shinde) दहा खासदार आणि 41 आमदारांना राज्य सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे त्यामुळे आता यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. 

एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राज्यांत सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांवर आणि त्यांच्या शाखा आणि घरावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सर्व आमदारांना सीआरपी जवानांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. आता माञ ही सुरक्षा कमी करण्यात आल्यामुळे या आमदारांना ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याबाबत गृह खात्याची रिव्ह्यू मीटिंग पार पडली त्यामध्ये या आमदारांच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. अजूनही राज्यांतील परिस्थिती पाहता या आमदारांना सुरक्षा पुरवणे गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतरच या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

सुरक्षा रद्द करण्यात आलेले प्रमुख नेते 

  • सतेज पाटील (Satej Patil)
  • बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)
  • नाना पटोले (Nana Patole)
  • छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
  • जयंत पाटील  (Jayant Patil)
  • धनंजय मुंडे (Dhananjay Munde)
  • विजय वडे्टीवार (Vijay Wadettiwar)
  • भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
  • अनिल परब (Anil Parab)
  •   नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) 

सुरक्षा कायम असलेले नेते

  • मिलिंद नार्वेकर
  • अशोक चव्हाण
  • जितेंद्र आव्हाड
  • अमित देशमुख
  • विश्वजीत कदम
  • वर्षा गायकवाड
  • यशोमती ठाकूर
  • के सी पाडवी

 महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा काल अचानक नव्या सरकारने रद्द केली आणि त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे नव्या सरकारने नार्वेकर, आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना अभय दिला आहे. त्यात ही मिलींद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या :

Milind Narvekar : विलासराव देशमुख ते एकनाथ शिंदे 'हे'  सात मुख्यमंत्री मिलिंद नार्वेंकरांसाठी 'लकी' 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Embed widget