एक्स्प्लोर

मराठा समाजाला डावलून नोकरभरती, राज्यभरात महावितरणच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चांचं आंदोलन

मराठा समाजाला डावलून महावितरणकडून नोकरभरती सुरु झाल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे.

पुणे/कोल्हापूर : महावितरणच्या नोकरभरतीविरोधात आजही मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला डावलून महावितरणकडून नोकरभरती सुरु झाल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे.

महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदांकरता राज्यभरात दोन हजार उमेदवार भरायचे होते. त्यासाठी जुलै 2019 मधे ऊर्जा विभागाकडून जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रं पडताळणीसाठी मागवण्यात आली. पंरतु दरम्यानच्या काळात सप्टेंबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे उर्जा विभागाने मराठा समाजातील उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करायचं ठरवलं. परंतु हा अन्याय असल्याचा आरोप करत महावितरणची भरती प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि दोन दिवस होणाऱ्या कागदपत्र पडताळणीत मराठा समाजालाही सामावून घ्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. तरीही प्रक्रिया सुरु राहिली तर आंदोलन हिंसक होईल असा इशाराही देण्यात आला.

2014 मध्ये देखील त्यावेळच्या सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं त्या आधारे महावितरणमधे उपकेंद्र सहाय्यक या पदांकरती मराठा समाजातील 495 पदांची निवड झाली होती. परंतु त्या आरक्षणालाही स्थगिती देण्यात आल्याने त्यांची नियुक्तीही अद्याप होऊ शकलेली नाही असं मराठा संघटनांचं म्हणनं आहे. न्यायालयाने स्थगिती देण्याच्या आधी या दोन्ही भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना महावितरणमध्ये सामावून घेतले जावे अशी आंदोलकांची मागणी आहे.

पुणे पुण्यातील रास्ता पेठेत आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. मराठा संघटनांच्या आंदोलनानंतर पुण्यातील महावितरण कार्यालयात सुरु असलेली कागदपत्रांची पडताळणी थांबवण्यात आली.

मनमाड मनमाड शहरात वीज महावितरण कंपनीच्या कार्यलायावर धरणे आंदोलन करुन तीव्र निदर्शने करण्यात आली. जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही, तोपर्यंत कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये, आरक्षणाचा तिढा तातडीने सोडवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजप, बहुजन वंचित आघाडी, शिवसेना, मुस्लीम विचार मंचने या आंदोलना पाठिंबा दिला.

कोल्हापूर कोल्हापुरात महावितरण कार्यालयात मराठा क्रांती मोर्चानं केलेल्या आंदोलनानंतर इथली भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. आज सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर हे सगळे आंदोलक कार्यालयात घुसले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकारी यांच्यावर फाईल आणि डायरी फेकल्याने वातावरण काही प्रमाणात तणावाचे बनले. त्यानंतर काही वेळातच विभागीय अधिकाऱ्यांशी फोनवरुन बोलणं झाल्यानंतर इथली भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली. आंदोलकांनी याचं लेखी पत्र महावितरणच्या कार्यालयाकडून घेतले.

Pune Maratha Kranti Agitation | भरती प्रक्रियेत मराठा तरुणांची नियुक्ती होत नसल्याने पुण्यात आंदोलन

Kolhapur Protest : 'महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक पदभरतीत मराठा तरुणांवर अन्याय', कोल्हापुरात आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget