एक्स्प्लोर

भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान? खडसे आणि तावडेंच्या संपर्कात असल्याची चर्चा

भाजपकडून तिकीट डावलली तरी मोठं मताधिक्य मिळालेले बंडखोर विरोधात बसावं लागल्यामुळे अस्वस्थ आहेत. महाविकासआघाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची भीती त्यांना आहे.

मुंबई : माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असतानाच भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान उभं राहिल्याचं म्हटलं आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्या संपर्कात असून वेगळा विचार करण्यासाठी या दोन्ही नेत्यांवर बंडखोरांचा दबाव असल्याचं कळतं. दरम्यान हे सर्व पराभूत बंडखोर आहेत. मात्र त्यांना 30 हजार ते 90 हजारांपर्यंत मतं मिळाली आहेत. भाजपने तिकीट डावललं तरी मोठा संघर्ष करुन, बंडखोरी करुन त्यांनी निवडणूक लढवली. मोठं मताधिक्य मिळालं, परंतु विरोधात बसावं लागल्याने बंडखोर अस्वस्थ आहेत. महाविकासआघाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीसाठी वेगळी समीकरणं दिसण्याची शक्यता आहे. 11 ते 12 भाजपचे बंडखोर उमेदार विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनाही पक्षाने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे बंडखोर तावडे आणि खडसेंच्या संपर्कात असण्यामागे 2014 च्या आधीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. या दोघांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं. तिकीट वाटपामध्ये दोन्ही नेते महत्त्वाची भूमिका निभावायचे. परंतु यंदाच्या निवडणुकीत दोघांनाही डावललं आणि आयातांना संधी दिली. त्यामुळे कोणाशी संपर्क करावा अशी मनस्थिती बंडखोरांची होती. त्यामुळे त्यांनी खडसे आणि तावडेंना संपर्क केला. आता एकनाथ खडसे आणि विनोद तावडे बंडखोरांची समजूत कशी काढणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. परंतु या बंडखोरांमध्ये भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. भाजप बंडखोर आणि त्यांना मिळालेली मतं :- बुलडाणा - योगेंद्र गोडे - 29943 दर्यापूर - सीमा सावळे - 18429 देवळी - राजू बकाने - 39541 तुमसर - चरण वाघमारे - 79490  (भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मिळाली होती 33457 मतं,  राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे 87190 मतं मिळवत 7700 मतांनी विजयी) नांदेड दक्षिण - दिलीप कंडकुरते - 43357 (शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मिळाली होती 37066 मतं, काँग्रेस उमेदवाराला मिळाली 46943 मतं, काँग्रेस फक्त 3592 मतांनी विजयी) बसमत - शिवाजी जाधव - 67070  (शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मिळाली होती 41557 मतं,  राष्ट्रवादीचे राजूभय्या नवघरे 75321 मतं मिळवत 8251 मतांनी विजयी) बोईसर - संतोष जनाथे -30952 (शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विलास तरे यांना मिळाली होती 75951 मतं,  बविआचे राजेश पाटील 78703 मतं मिळवत फक्त 2752 मतांनी विजयी) कल्याण पश्चिम - नरेंद्र पवार - 43209 अहमदपूर - दिलीप देशमुख - 45846 (भाजपच्या अधिकृत उमेदवाराला 55445 मतं मिळाली होती, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील 84636 मतं मिळवत 29191 मतांनी विजयी) पंढरपूर - समाधान अवताडे - 54124  (भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76426 मतं मिळाली होती, राष्ट्रवादीचे भारत भालके 89787 मतं मिळवत 13361 मतांनी विजयी) कागल - शमरजित सिंग घाटगे - 88303 (शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय घाटगे यांना 55657 मतं मिळाली होती, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ 1 लाख 16 हजार 436 मतं मिळवत फक्त 28 हजार 133 मतांनी विजयी) इस्लामपूर - निशिकांत भोसले - 43394 संबंधित बातम्या Special Report | एकनाथ खडसेंना दूर ठेऊन भाजपने चूक केली? | ABP Majha Eknath Khadse | सिंचन घोटाळ्यांचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले : एकनाथ खडसे | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
Nagpur Leoprad : नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
Embed widget