एक्स्प्लोर

औरंगाबाद का धुमसलं? जाळपोळीची कारणं काय?

शहरात काल झालेल्या वादात दोघांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय, औरंगाबाद पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या काही कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तर 15 ते 16 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. सध्या औरंगाबाद पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात काल झालेल्या वादात दोघांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय, औरंगाबाद पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तर सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. मात्र या प्रकरणाची नेमकी ठिणगी पडली कुठे, याबाबत अनेक दावे केले जात आहेत. औरंगाबादमध्ये काय झालंरात्री 10 वाजता औरंगाबादमधल्या जाळपोळीची पहिली ठिणगी गांधीनगर आणि मोतीकारंजामध्ये पडली. क्षुल्लक कारणावरुन तरुणांमध्ये हाणामारी सुरु झाली आणि त्याला सोशल मीडियाने हवा दिली. रात्री 11 वाजता गांधीनगरात सुरु झालेला वाद सोशल मीडियामुळे पसरत गेला. शहागंज भागात दोन गट समोरासमोर आले. एकमेकांवर दगडफेक सुरु झाली. घरासमोरच्या गाड्या पेटवण्यात आल्या. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत शहागंज पेटलं होतं. मध्यरात्री 2 वाजता आतापर्यंत या दंगलीचं लोण गांधी पुतळा, लोटाकारंजा, नवाबपुरा या भागापर्यंत पोहोचलं होतं. निजामुद्दीन चौकात जाळपोळ सुरु झाली. चिंचोळ्या गल्ल्यांच्या या भागात आग भडकत गेली आणि दुकाने जळाली. पहाटे 3 वाजता या दंगलीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना कठोर व्हावं लागलं. सुरुवातीला पोलिसांनी लाठीमार सुरु केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्लॅस्टिक बुलेटने फायरिंग केलं. यात 17 वर्षांचा मुलगा जखमी झाला. जखमी झालेल्या तरुणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पहाटे 4 वाजता पण तितक्यात निजामुद्दीन चौकातल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि सगळीकडे अंधार पसरला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण झाला. पुढचा तासभर गांधीनगर, निजामुद्दीन चौक, मोतीकारंजा चेलिपुरा, मंजूरपुरा, शहागंज भागात जाळपोळ सुरु झाली. सकाळी 8 वाजता दिवस उजाडताच जाळपोळ आटोक्यात आली. दिवसा उजेडी सारं काही शांत होईल असं वाटत असतानाच राजाबाजारमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. कारण इथे अज्ञातांनी एका दुकानावर पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या. दुपारी 12 वाजता दुपारी बारा वाजेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली. पण चंपा चौक आणि रोशन गेट भागात मात्र आग धुमसतच होती. अवघ्या 14 तासांमध्ये क्षुल्लक कारणावरुन दोन जण दगावले, 51 जण जखमी झाले, 100 दुकानं फुटली, अनेक दुचाकी आणि चारचाकी जाळल्या, तर दोन घरं कोसळली. फक्त एका किरकोळ घटनेपायी... औरंगाबाद पेटण्यामागचं नेमकं कारण काय? औरंगाबाद का धुमसलं यामागे प्रत्येकाकडून वेगवेगळं कारण सांगितलं जात आहे. प्रत्येकाने वेगवेगळा दावा केला आहे. या दंगलीचं पहिलं कारण हे शहागंज भागातून समोर येतंय. सरदार वल्लभभाईंचा पुतळा आणि या ऐतिहासिक पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण त्यासाठी इथे असलेल्या पानाच्या टपऱ्या हलवण्याची आवश्यकता होती. तसे आदेशही निघाले आणि यावरुनच वादाला तोंड फुटलं आणि त्याला धार्मिक रंग मिळाला, असाही दावा आहे. शहागंज भागातल्या बाजारपेठेत काही हातगाडीवाले हे व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गाड्या लावतात. त्यामुळे दुकानदारांचा त्यांचावर रोष होता. दुकानदारांनी स्थानिक नगरसेवक लच्छू पहिलवान यांच्याकडे दादही मागितली होती. त्यानुसार लच्छू पहिलवान यांनी या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी पालिकेकडे केली. याच वादातून ही जाळपोळ झाल्याचा दावा केला जात आहे. महापालिकेच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन मोतीकारंजा भागात दोन गटात हाणामारी झाली. त्याच हाणामारीने उग्र रुप धारण केलं आणि मग भडका उडाला, असाही काहींचा दावा आहे. चौथी थिअरी तर भयंकर आहे. काही दिवसांपूर्वी शहागंज भागात एका व्यक्तीने आंबे खरेदी केले. त्यातले अनेक आंबे खराब निघाले. तेच आंबे बदलून घेण्यासाठी तो विक्रेत्याकडे गेला. विक्रेत्याशी त्याची बाचाबाची झाली आणि त्याच फळांच्या गाड्या हटवण्याची मागणी सुरु झाली आणि त्यातूनच दंगल उसळली, असंही सांगितलं जातंय. आता त्यात आणखी एका थिअरीची भर घातली ती शिवसेनेने. औरंगाबादमधल्या एका दंगलग्रस्त भागात एका महिलेची छेड काढण्यात आली. त्यावरुन वादाला तोंड फुटलं आणि दोन समुदायाचे लोक एकमेकांवर धावून गेले, असा दावा करण्यात आला. दंगल झाल्यानंतर अफवा पसरवू नका असं खुद्द सरकार आणि पोलीस सांगतात. पण औरंगाबादमधल्या या जाळपोळीमागे वेगवेगळी कारणं सांगून हवा नेमकी कोण देतंय, हा मोठा प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget