एक्स्प्लोर
Advertisement
एसटीची पहिली स्लीपर बस 'रातराणी' प्रवाशांच्या सेवेत दाखल
एसटीच्या ताफ्यात आता एका नवीन रातराणी बसचा समावेश झाला आहे. शयनयान (स्लीपर) आणि आसन अशा दोन्ही व्यवस्था असलेल्या एसटी बसेसचे आज लोकर्पण करण्यात आले आहे.
मुंबई : एसटीच्या परळ आगारात एसटी महामंडळाकडून शयनयान (स्लीपर) व आसन अशा दोन्ही व्यवस्था असलेल्या एसटी बसेसचे आज लोकर्पण करण्यात आले. एसटीच्या 'रातराणी' बस म्हणून या बसेस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 40 बसेस राज्यात आता धावणार आहेत.
माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतील ही रातराणी नव्या रुपात आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा तिकीट दरात उपलब्ध आहे. सध्याच्या निम आराम (हिरकणी)बसच्या तिकीट दरात ही रातराणी प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. एकाच बसमध्ये 30 पुषबॅक आरामदायी आसने आणि त्याच्यावर 15 स्पेशियस बर्थ असलेली विनावातानुकुलीत सीटर कम स्लिपर बस एसटीच्या विविधांगी बसेसच्या ताफ्यात आज सामील झाली आहे.
मुंबईतल्या चाकरमान्यांना एसटीच्या रातराणी बससेवेचं एक वेगळंच अप्रूप होतं. विशेषत: कोकणातून मुंबई व मुंबई उपनगरात येणाऱ्या एसटीच्या रातराणी बसेस चाकरमान्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. कालांतराने खासगी बस सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता, तसेच तिकीट दर त्यामुळे हा वर्ग आपसूकच खासगी बस वाहतुकीकडे ओढला गेला.
आज संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 18 हजार रातराणी खासगी बसेस चालतात. सहाजिकच एक मोठा प्रवासी वर्ग एसटीपासून गेल्या दहा वर्षांमध्ये दुरावला आहे. असुरक्षित आणि अनियमित अशा खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळलेला मोठा प्रवासी वर्ग एसटीकडे पुन्हा वळवण्याची एक सुवर्णसंधी महामंडळाला प्राप्त झाली आहे. कारण एसटीने रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाची गरज ओळखून, एकाच गाडीत आसन आणि आरामात झोपण्याची व्यवस्था असणाऱ्या स्लीपर बसेसची निर्मिती केली आहे.
विना वातानुकूलित असलेली ही बस मजबूत अशा माईल्ड स्टीलमध्ये बांधण्यात आली आहे. अशा 200 बसेस एसटीकडून बांधण्यात येत असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 40 बसेस या आठवड्यात राज्यातील विविध मार्गांवर प्रवासी सेवेसाठी रूजू होत आहेत. रात्रीच्या आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची एक वेगळी अनुभूती देणारा प्रयोग सर्वसामान्य प्रवाशांच्या पसंतीला उतरेल, असे महामंडळाला वाटते.
आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये
1. ही बस 12 मीटर लांबीची असून मजबूत अशा माईल्ड स्टील मध्ये बांधण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनामध्ये प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध आहे.
2. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये 30 आरामदायी पुश बॅक आसने व 15 शयन (बर्थ) आहेत.
3. या गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायनॅमिक आकार देण्यात आलेला असून पुढील व मागील शो आकर्षक एफआरपीमध्ये तयार केलेला आहे.
4. पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक बसविलेले आहेत.
5. चालक केबिनमध्ये अनाऊन्सिंग सिस्टीम बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर बसविण्यात आलेला असून त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे.
6. पाठीमागील बाजूस एक रिव्हर्सिंग कॅमेरा बसविलेला असून त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात देण्यात आलेली आहे.
7. या बसमध्ये खालील बाजूस बसण्यासाठी आरामदायी पुश बॅक सीट्स देण्यात आलेले आहेत. सदर सीट्स पाठीमागील बाजूस 250 एम एम पर्यंत पुश बॅक देण्यात आलेला आहे.
8. प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून मोबईल ठेवण्यासाठी पाऊच दिलेला आहे. तसेच मॅगझीन पाऊच व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी ब्रॅकेटची सुविधा देण्यात आली आहे. तसेच पर्स अडकिवण्यासाठी हुक दिलेला आहे.
9. प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग लॅम्प व निळ्या रंगाची नाईट लॅम्प या दोनही सुविधा एकत्र असलेले एलईडी लाईट बसविण्यात आलेले आहेत.
10. प्रत्येक शयन कक्षाला एक कोच फॅन देण्यात आलेला आहे.
11. हवेच्या दाबावर उघडझाप होणारा प्रवासी दरवाजा बसविण्यात आलेला आहे.
12. आपत्कालीन सुटकेसाठी गाडीच्या मागील बाजूस एक संकटकालीन दरवाजा तसेच पुढील उजव्या बाजूला प्रवासी आपत्कालीन खिडकीची सुविधा देण्यात आलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती मध्ये काचा फोडण्यासाठी पुरेसे हातोडे योग्य ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत.
13. प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे सामान कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.
14. आगीपासून सुरक्षितता मिळण्यासाठी वाहनामध्ये आग प्रतिबंधक उपकरणे आहेत.
15. पुरेशी हवा व प्रकाश येण्यासाठी वाहनाच्या खिडक्यांचा आकार 1900 मिलीमीटर ठेवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
Advertisement