एक्स्प्लोर

कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश

कोकणात ठाकरेंची ताकत कमी होत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अशातच आता रत्नागिरीत (Ratnagiri) उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Ratnagiri :  गेल्या काही दिवसापासून कोकणात शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group)  जोरदार धक्के बसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटासह इतर पक्षात प्रवेश करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं कोकणात ठाकरेंची ताकत कमी होत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अशातच आता रत्नागिरीत (Ratnagiri) उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती विनोद झगडे हे शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. हा ठाकरे गटाला मोठा धक्का असू शकतो. 

पालकमंत्री उदय सामंत यांच्या चिपळूण दौऱ्यात विनोद झगडेंची उपस्थिती

रत्नागिरीत उध्दव गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता. जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती विनोद झगडे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या चिपळूण दौऱ्यात विनोद झगडे हे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विनायक राऊत यांचे विश्वासू म्हणून विनोद झगडे यांची ओळख आहे. झगडे यांनी या आधीच तालुका प्रमुख पदाचाही राजीनामा दिला आहे. विनोद झगडे आमच्यासोबत आले तर चिपळूणमध्ये आमच्या पक्षाला फायदाच होईल असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. झगडेंनी आमची रांग स्वीकारली आहे. आता त्यांचे म्हणणे कानात ऐकूण ठरवू  असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केल्यानं झगडे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. 

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांचेच नेतृत्व आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडे मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासारखे बडे नेते आहेत. त्यामुळे, सध्या शिंदेंच्या शिवसेनेचा आलेख कोकणात वाढत असून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. कोकणच्या बालेकिल्ल्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गट कशारितीने सामोरे जाणार हे पाहावे लागेल. 

महत्वाच्या बातम्या:

ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget