एक्स्प्लोर

Chiplun Flood : चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात; पालिका या तीन विभागांना पाठवणार नोटीस!

Ratnagiri chiplun rain flood :पाटबंधारे विभागानं मात्र मुसळधार पाऊस, भरती, जगबुडी आणि वाशिष्ठीचा संगम याबाबींना चिपळूण पुराला जबाबदार धरलं आहे. यानंतर आता चिपळूण पालिका देखील आक्रमक झाली आहे.

Ratnagiri chiplun rain flood : जलयम झालेलं चिपळूण सर्वांच्या डोळ्यासमोर आलं. काहींनी आपली माणसं गमावली. कुणीची मालमत्ता, संसार, उदरनिर्वाहाची साधणं गेली. सध्या चिपळूण शहरात शांतता आणि चेहऱ्यावर सारं काही गमावल्याची भावना असं चित्र आहे, आम्ही उभं राहू ही जिद्द असली तरी डोकं मात्र काहीच काम करत नाही. दरम्यान, चिपळूणच्या पुरानंतर त्याला कारणीभूत असलेल्या बाबींवर विचारमंथन, चर्चा आणि कारणमीमांसा सुरू आहे. स्थानिकांच्या मते कोळकेवाडी धरणातून झालेला पाण्याचा विसर्ग आणि त्यावेळी स्थानिकांना कल्पना दिली नाही असा देखील एक मोठा मतप्रवाह दिसून येतो. पण, पाटबंधारे विभागानं मात्र मुसळधार पाऊस, भरती, जगबुडी आणि वाशिष्ठीचा संगम याबाबींना चिपळूण पुराला जबाबदार धरलं आहे. यानंतर आता चिपळूण पालिका देखील आक्रमक झाली आहे. त्यांनी थेट पाटबंधारे विभाग, हवामान विभाग आणि महसूल विभागाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. याबाबतचा ठराव 5 ऑगस्टच्या सभेत झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी दिली आहे. 

Chiplun Flood : 'या' कारणामुळं चिपळूण शहरात पूर, अहवाल शासनाला सादर

काय आहे नगराध्यक्षांचं म्हणणं? 
आज चिपळूण पूर्णता उद्धवस्त झालं आहे. पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. पण, यापुराबाबत हवामान आणि पाटबंधारे विभाग यांनी कोणतीही कल्पना दिली नाही. पाऊस मुसळधार होता ही गोष्ट मान्य. पण, त्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीची कल्पना देणे अपेक्षित होते. त्याबाबत काहीही कल्पना दिली गेली नाही. शिवाय, पंचनामे करताना देखील चालढकल होत आहे. नागरिक, व्यापारी महसुल विभागाच्या कामगिरीवर आपली नाराजी बोलून दाखवतात. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पण, कृषि विभाग मात्र याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही. त्यामुळे आता आम्ही चिपळूणकरांचा विचार करत कोर्टात जाणार आहोत. प्रथम या तिन्ही विभागांना नोटीस काढली जाईल. तिन नोटीसांना त्यांचं उत्तर काय येतं हे पाहिलं जाईल. त्यानंतर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशी माहिती चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. 

पंचनाम्यांबाबत जिल्हा प्रशासन काय म्हणतं? 
जिल्ह्यातील पंचनामे 2 तारीखला पूर्ण झाले असून जिल्हा माहिती कार्यालयानं याबाबतची माहिती 2 ऑगस्ट रोजीच दिली आहे. यामध्ये माहिती कार्यालयानं 'जिल्ह्यामध्ये 22 आणि 23 जुलै 2021 रोजी  झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरपरिस्थितीमुळे  बाधित झालेल्या व्यक्तिंच्या मालमत्तेचे पंचनामे करण्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.या आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाना मदत सुरु करण्यात आली असून  यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनाही मदत देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.


ज्या नागरिकांचे भांडी,कुंडी आणि कपडयांचे नुकसान झाले आहे. त्यांना प्रति कुटुंब 5 हजार रुपयेप्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये  57 ठिकाणी 1712 लोक सुरक्षित ठिकाणी आश्रयास राहत आहेत. त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन, पिण्याचे पाणी आणि आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना 01  ऑगस्ट 2021 अखेरपर्यंत  86  गावातील एकूण 1626 कुटूंबांना 162.60 क्विंटल गहु आणि  162.60 क्विंटल तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, एकूण 37 गावातील 304 कुटूंबांना 1520 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले आहे.  अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 01 ऑगस्ट 2021 अखेर एकूण 25 हजार 665 लोकांना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण 104 सामाजिक संस्था आणि 21 व्यक्तिंनी पूरग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत मदत केली आहे.' अशी माहिती दिली आहे. 

पाटबंधारे खात्याच्या अहवालामध्ये काय म्हटलं आहे? 
1 ) रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सातत्यानं 4 ते 5 दिवस जोरदार पाऊस. दिवसाला साधारण 200 ते 250 मिली मीटर पाऊस झाल्यानं पूरस्थिती उद्भवली. 
2 ) सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोयना बॅक वॉटर, रघुवीर घाट इत्यादी ठिकाणी झालेले प्रचंड पर्जन्यमान त्यामुळे पश्चिमेकडील मुक्त पाणलोटक्षेत्रमधून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही पूरस्थिती उद्धवली. 
3 ) कोयना धरणामध्ये 2.67 लाख क्यूसेक्स  ताशी सरासरीने पाणी आलेले आहे. 24 तासात 15 ते 15 टीमसी इतकी पाण्याची आवक झाली. 
3 ) भरतीच्या पाण्यामुळे नगीपात्रातील पाण्याचा समुद्रामध्ये निचरा होऊ शकलेला नाही. 
4 ) याचवेळी रघुवीर घाट, सह्याद्री डोंगर माथ्यावरील पावसाने खेड तालुक्यातील जगबुडी नदीला आलेल्या पुरानं त्या ठिकाणची पाणी पातळी 7.50 मीटर होती. अंदाजे पाणी 7000 ते 8000 क्यूसेक्स इतका विसर्ग नदीत होता. जगबुडी नदी चिपळूण शहराजवळच्या बहिरवली गावाजवळ वाशिष्ठीला मिळते. त्यामुळे या पाण्यानं चिपळूण शहरातील म्हणजेच वाशिष्ठी नदीतील पाणी थोपवले गेल्याची शक्यता निदर्शनास आली नाही. परिणामी चिपळूण शहरातील पूर ओसरला नाही. 
5 ) कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मिती करून 20 आणि 21 जुलै रोजी 3000 क्यूसेक्स तर 22 जुलै रोजी 8622 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू होता. 22 जुलै रोजी 21.10 द.ल.घ.मी तर 23 जुलै रोजी 10.8 द.ल.घ. मी. इतकेच पाणी कोळकेवाडीतून वाशिष्ठी नदीमध्ये सोडण्यात आले.कोळकेवाडीतून द्वार संचलन करून करून पुराचे पाणी सोडण्यात आलेले नाही. परंतु कोळकेवाडी धरणाच्या पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा पोहोचत असल्यानं त्यांनी विजनिर्मीती करून करून पाणी नियंत्रित करणे आवश्यकच होते. या विसर्गामुळे पूरस्थिती उद्धवली नाही. परंतु विसर्ग हा सतत चालू असल्यानं पूर उतरण्यास थोडासा विलंब झाला. 
6 ) सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेड आणि चिपळूण शहराचे क्षेत्र हे जलसंपदा विभागाने निषिद्ध पूर प्रवण क्षेत्र दर्शवणारी निळीपूर रेषा आणि नियंत्रित पूर प्रवण क्षेत्र दर्शवणारी लाल पूररेषा केलेल्या सर्वेक्षणानुसार निळी पूररेषाच्या क्षेत्रात येत आहे. किमान सर्व बांधकामांचे जोतापातळी अर्थात निळी पूररेषाच्या वर म्हणजेच एक मजला उंच करणे आवश्यक आहे. याबाबत पुनर्वसनाबाबत निश्चित धोरण आखणे आवश्यक आहे. कारण अतिवृष्टीच्या काळात दोन्ही शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असते. फक्त यावेळी पूरपातळीची उंची जास्त होती. 

आवश्यक उपाययोजना    
1 ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धरण आणि कालव्यांची आवश्यक दुरूस्ती घेणे आवश्यक आहेच. त्याचबरोबर ज्या धरणांना गळती आहे, विमोचक नादुरूस्त आहेत इत्यादी धरण सुरक्षिततेची कामे तातडीनं हाती घेणे आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे धरणाचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेला नीही. परंतु कोकणातील अतिवृष्टी विचारात घेता उपरोक्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
2 ) पूरपरिस्थिती अद्यावत माहिती अखंडपणे प्राप्त होत राहण्याकरता Atomization होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वयंचलित रेन गेज स्टेशन, स्वयंचलित रिव्हर गेज स्टेशन, अद्यावर रडार यंत्रणा व संपर्क साधण्यासाठी सॅटेलाईट यांची सुविधा आवश्यक आहे. 
3 ) कृष्णा खोऱ्यामध्ये राबवण्यात येत असल्याप्रमाणे Real Time Data System ची यंत्रणा कोकणात प्रत्येक जिल्ह्यासाठी जलसंपदा विभागाचे जलविज्ञान विभागामार्फत उभारणे आवश्य़क आहे. जेणेकरून पर्जन्यमानाची व येणाऱ्या विसर्गाची किमान 4 ते 24 तास अगोदर सुचना महसुल यंत्रणेला देणे शक्य होईल 


4 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनानं दिलेली माहिती खालीलप्रमाणे

चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या पुरानंतर मोठया प्रमाणावर बचाव आणि स्चच्छता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. आता यातील बाधितांच्या पूनर्वसन करण्याच्या कामास गती देण्यात आली आहे. मृतकांचे वारस यांना प्रत्येकी 4 लाख रुपये तसेच भांडे व कपडे यासाठी बाधितांना तातडीची मदत म्हणून 85 लाख 45 हजार रुपये आणि जखमींना 91 हजार 800 रुपये मदत दिली असे एकूण 1 कोटी 78 लाख 36 हजार 800 रुपये मदत वाटप करण्याचे काम प्रशासनाने केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी दिली.खेड तालुक्यात पोसरे येथील भुस्खलन दुर्घटनेत 17 व्यक्ती मरण पावल्या त्यापैकी 14 जणांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 56 लाख रुपयांची मदत देण्यात आली तर बिरमणी दुर्घटनेतील 2 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्यात आले.चिपळूण तालुक्यात 5 जणांचा मृत्यू झाला यात 20 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. पुरानेबाधित 1769 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 88 लाख 45 हजारांची मदत देण्यात आली आहे.या व्यतिरिक्त पोसरे दुर्घटनेतील जखमी 17 व्यक्तींना 73 हजार 100 रुपये तर पेढे परशूराम येथील एका जखमी व्यक्तीस 12 हजार 700 रुपये मदत देण्यात आली आहे.

जुलै 2021 अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेले नुकसान (( जिल्हा माहिती कार्यालयाची आकडेवारी ))

मयत :- मृतसंख्या - 33 (12 बुडून मयत व 21 दरड कोसळून मयत)
आवश्यक अनुदान - 132 लाख (प्रती मृत व्यक्ती 4 लाख प्रमाणे)

वितरित अनुदान - लेखाशिर्ष 22450155 अंतर्गत मृत, जखमींसाठी उणे प्राधिकाराची सुविधा उपलब्ध असल्याने अनुदान उणे पध्दतीने काढण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

जखमी :- जखमींची संख्या - 18
आवश्यक अनुदान - 1 लाख 53 हजार (चिपळूण 1 प्रकरणात रु. 12 हजार 700 व खेड 17 जखमींपैकी 8 प्रकरणात 12 हजार 700 प्रमाणे 1 लाख 1 हजार 600 व 9 प्रकरणात 4 हजार 300 प्रमाणे 38 हजार 700 असे एकूण 1 लाख 53 हजार रुपये.

पशुधन :- नुकसान
मोठे दुधाळ - 521
लहान दुधाळ - 202

ओढकाम करणारे मोठे - 83
ओढकाम करणारे लहान - 163

 कुक्कुटपालन - 4553 कोंबडया
आवश्यक अनुदान - 211.47 लाख

हस्तकला कारागिरांचे नुकसान
हत्यारे/अवजारे नुकसान - संख्या - 24
आवश्यक निधी - 98 हजार 400
कच्चा मालाचे नुकसान - संख्या - 24
आवश्यक निधी - 98 हजार 400

 कपडे/भांडी नुकसान
बाधित कुटुंबांची संख्या - 13108

आवश्यक अनुदान - रु.655.40 लाख (उणे पध्दतीने प्रति बाधित कुटुंब रु.5000/- प्रमाणे अनुदान काढण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.)

पडझड झालेली घरे :- पूर्णत: पक्की/कच्ची पक्की 59 व कच्ची 51 एकूण 110

प्रत्यक्ष नुकसान - रु.438.98 लाख

आवश्यक अनुदान - रु.104.61 लाख (रु.95100/- प्रति घर प्रमाणे)

अंशत: पक्की/ कच्ची - पक्की 1486 व कच्ची 1336 एकूण 2822

प्रत्यक्ष नुकसान - रु.2325.75 लाख

आवश्यक अनुदान - रु. 169.32 लाख (रु.6000/- प्रति घर प्रमाणे)

 झोपड्या:-
एकूण नुकसान - 67

प्रत्यक्ष नुकसान- रु.9.90 लाख

आवश्यक अनुदान - रु. 4.02 लाख ( रु.6000/- प्रति झोपडी प्रमाणे)

 गोठे -

एकूण नुकसान - 370
प्रत्यक्ष नुकसान - रु.477.60 लाख
आवश्यक अनुदान - रु. 7.77 लाख (रु.2100/- प्रति गोठा प्रमाणे)
घरासाठी एकूण आवश्यक अनुदान - रु.285.72 लाख

मदत छावण्या

संख्या - 68
- सुरु करण्यात आलेल्या दिवसाची सरासरी - 15 दिवस
- एका दिवसाला छावण्यात असणारे सरासरी लोक - 2493
- एकूण खर्च - रु. 73.15 लाख
- प्राप्त अनुदान - रु. 1 कोटी

कचरा उचलणे

बाधित गावे 21
प्राप्त अनुदान - रु.1 कोटी

मत्स्य विभाग

 - नुकसान - 1. अंशत: होडी - 4
- पूर्णत होडी -6
-अंशत: जाळी-4
- पूर्णत: जाळी -7

 मत्स्यशेती -0.10 हे.आर.
- एकूण आवश्यक अनुदान - रु.1.0142 लाख

 शेती:- नुकसान
- शेत जमीन खरडणे/खचणे - क्षेत्र 190.75 हे.आर.
- शेत जमिनीवर गाळ साचून नुकसान - क्षेत्र 480.86 हे.आर
- आवश्यक अनुदान - शेत जमीन खरडणे/खचणे - रु.71.53 लाख (रु.37500/- प्रति हे.आर. प्रमाणे )
- शेत जमिनीवर गाळ साचून नुकसान - 56.23 लाख (रु.12200/- प्रति हे.आर. प्रमाणे )

एकूण आवश्यक अनुदान - रु.127.76 लाख

सार्वजनिक मालमत्ता नुकसान

महावितरण - 344 लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग - 13105.15 लाख, राष्ट्रीय महामार्ग - 1470 लाख, जिल्हा परिषद - 7469.72 लाख, वन विभाग - 34.84 लाख, पोलीस विभाग - 39.76 लाख, पाटबंधारे विभाग - 1146 लाख, नगरपालिका/नगरपरिषद - 5377 लाख, एसटी महामंडळ - 326.49 लाख असे एकूण 29312.96 लाख.

वाहनांचं नुकसान - दुचाकी व चार चाकी वाहने 4854 (चिपळूण), 25 (खेड)

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 02 ऑगस्ट 2021 पर्यंत दिलेली मदत
- धान्य वाटप - गहू - 175 क्विंटल, तांदूळ - 175 क्विंटल, वाटप केलेली बाधित गावे - 200, वाटप केलेली बाधित कुटुंब 1751
- शिवभोजन थाळी वाटप - ऑनलाईन - 25982 ऑफलाईन - 2141
- केरोसीन वाटप 1810 लिटर
- वाटप केलेली बाधित गावे .44
- वाटप केलेली बाधित कुटुंब - 362

स्वच्छता व आरोग्य
चिपळूण व खेड नगरपालिकांमध्ये व ग्रामीण परिसरामध्ये स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून चिपळूण व परिसरात 70 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच खेड व परिसरात 100 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. चिपळूण खेड व परिसरातील पाणीपुरवठा व वीजपुरवठा 100 टक्के पूर्ववत करण्यात आला आहे.

पुरानंतरची स्थिती व नियंत्रण:-

चिपळूण व खेड नगरपालिका व परिसरामध्ये पूर स्थिती ओसरल्यानंतर साथीचे रोग होऊ नये म्हणून निर्जतूकीकरण करण्यात आले आहे. घरोघरी जावून साथीच्या रोगाच्या व डेंग्यू व लेप्टोस्पायरॉसिसच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी शुद्धीकरण, घरोघरी मेडिक्लोअरचे वाटप, साथीच्या रोगासंबंधी जनजागृती व उपचार, जंतूनाशक फवारणी व ब्लिचिंगाडिटीटीचे फॉगिंग आदी गोष्टी करण्यात आल्या आहेत.

चिपळूण शहर व परिसरामध्ये आरोग्य तपासणीसाठी 34 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आता पर्यत 21322 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यामध्ये 66040 लोकांचा समावेश आहे. एकूण 86940 क्यॅप्सूलचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी लक्षणे असणा-या 14490 रुग्णांना क्वॅप्सूल, डॉक्सी -प्रॉफिलॅक्सीसचे वाटप करण्यात आले आहे.

तपासणी करण्यात आलेले रुग्ण - 21837
खेड- खेड शहर व परिसरामध्ये सुध्दा तपासणी व औषधांचे वाटप सुरु असून 5 पथके कार्यरत आहेत.

सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तीकडून मदत-
एकूण सामाजिक संस्था - 113
दानशूर व्यक्ती-25

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget