ट्रकने दिली सहा गाड्यांना धडक, एकाचा जागीच मृत्यू तर चार जण जखम, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) भीषण (Accident) अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावात हा भीषण अपघात झाला आहे.
Ratnagiri Accident : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) भीषण (Accident) अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावात हा भीषण अपघात झाला आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली आहे. यामध्ये एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली आहे. धडक बसलेल्या वाहनांमध्ये आरटीओ विभागाची गाडी देखील आहे. महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातामुळे हातखंबा ग्रामस्थ भितीच्या छायेत आहेत.
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत कारची दुचाकीला जोराची धडक, आरे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
मुंबईच्या (Mumbai) गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरात पिकनिक पॉईंटजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा मोठा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. दारुच्या नशेत कार चालवत असल्यामुळं कारने बाईकला जोरदार धडक दिली आहे. यावेळी कार चालकाने कारमध्ये बोगस महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावून बाईक चालकाला दमदाटी केली आहे. बाईक चालकाची फिर्यादीवरून बोगस महाराष्ट्र शासनाचा कारवर नेमप्लेट लावून फिरणाऱ्या कार चालकाविरोधात आरे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरे पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात
नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघाताची घटना घडली. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. गंभीर जखमींना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेली ही धडक इतकी भीषण होती की जीप जागेवरच पलटी झाली. याशिवाय, ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 ते 6 मोटरसायकललाही चिरडले. त्यामुळे, या विचत्र अपघातात दुचाकीसह तेथे रस्त्यावर असणारे 7 ते 8 जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे बाराहाळी नाका परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























