एक्स्प्लोर
Advertisement
रावसाहेब दानवेंच्या हेलिकॉप्टरची वाट चुकली
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र पदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे हेलिकॉप्टर चुकल्याची घटना घडली आहे.
परभणी : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र पदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे हेलिकॉप्टर चुकल्याची घटना घडली आहे. परभणी दौऱ्याच्या वेळी दानवे यांचे हेलिकॉप्टर विद्यापीठात लँड केले जाणार होते. परंतु पायलटने हे हेलिकॉप्टर थेट पोलीस मुख्यालयाला नेले. अक्षांश, रेखांश न मिळाल्याने हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या मारत होते. दुसऱ्या बाजूला दानवेंच्या हेलिकॉप्टरसाठी विद्यापीठात हेलिपॅड तयार करण्यात आले होते.
रावसाहेब दानवे सध्या परभणी दौऱ्यावर आहेत. ते आज विद्यापीठाला भेट देणार होते. परंतु दानवेंचे हेलिकॉप्टर विद्यापीठात पोहोचण्याऐवजी थेट पोलीस मुख्यालयात पोहोचले. हेलिकॉप्टरच्या पायलटला अक्षांश, रेखांश न सापडल्यामुळे हेलिकॉप्टरची वाट चुकली. त्यानंतर विद्यापीठातील लोकांशी फोनवरुन बोलल्यानंतर पायलटने हेलिकॉप्टर विद्यापीठाकडे वळवले.
दरम्यान हेलिकॉप्टरची वाट चुकल्यानंतर हेलिकॉप्टरने आकाशात तीन घिरट्या घेतल्या. विद्यापीठात हेलिपॅड तयार केलेले असतानाही हेलिकॉप्टरची वाट चुकली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
Advertisement