एक्स्प्लोर

डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही

Ranjitsinh Disale News : रणजितसिंह डिसले हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याची माहिती खोटी निघाल्यानंतर आता त्यांच्यावर केलेला स्वत:चा पगार स्वत: काढल्याचा आरोपही खोटा असल्याचं समोर आलं आहे.

Ranjitsinh Disale News : ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याची माहिती खोटी निघाल्यानंतर आता त्यांच्यावर (Disale Guruji)केलेला स्वत:चा पगार स्वत: काढल्याचा आरोपही खोटा असल्याचं समोर आलं आहे. समितीचा (Solapur ZP) निष्कर्ष आहे की, प्रभारी मुख्याध्यापक कदम यांनी सांगितलं की, शालार्थ वेतन प्रणालीचा आयडी आणि पासवर्ड डिसले यांच्याकडे होता. त्यावरुन डिसले यांनी स्वत:चा पगार परस्पर काढून घेतला असं मुख्याध्यापक कदम यांनी सांगितल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे.  मात्र खुद्द कदम यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या खुलाश्याचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ज्यात कदम यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, डिसले यांच्या प्रतिनियुक्तीच्या आदेशात उल्लेखित केल्याप्रमाणे त्यांचे वेतन मूळ आस्थापनेवरुन करण्याचे आदेश होते. त्यानुसार त्यांचे वेतन मूळ आस्थापनेवरुन गटशिक्षणाधिकारी यांनी अदा केले आहे, असे या खुलाश्यात म्हटले आहे.

हा होता आरोप
डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही

कदम यांनी दिलेल्या पत्रात हे देखील म्हटलं आहे की, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक यांन वेतन काढण्याबाबत कोणतेही आदेश गटशिक्षणाधिकारी अथवा वरिष्ठ कार्यालयाने मला दिलेले नाहीत. डिसले यांच्या वेतनाबाबत वरिष्ठांनी मला दिलेल्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात आलेलं आहे, असं या खुलाश्यात म्हटलं आहे.  

हे आहे सत्य

डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही

डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही

डिसले यांच्यावर शिल्लक रकमेचं विवरण दिलं नसल्याचा आरोपही खोटा

डिसले यांच्यावर शिल्लक रकमेचं विवरण दिलं नसल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.  मात्र कॅशबुकचे अवलोकन केले असता डिसले यांनी शिल्लक रकमेचे विवरण दिलेले दिसून येत आहे. या कॅशबुकवर डिसले यांनी खर्चाचं विवरण सविस्तर दिल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्यामध्ये व्यवहार डिसले यांच्या सहीने झाले असून त्यातील पावत्यांची रक्कम आणि पासबुकवरील शिल्लक असलेली रक्कम समान असल्याचं सांगितलं आहे. 

शिल्लक रकमेबाबत हा होता आरोप

डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही

हे आहे सत्य

डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही

आधी गैरहजर असल्याचा दावा खोटा आता वेतनासंदर्भातही प्रशासन तोंडघशी

रणजितसिंह डिसले हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याचा ठपका जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या फेरतपासणी अहवालात ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे हा निष्कर्ष खोटा असल्याचा दावा डिसले यांनी केला आहे. समितीचा निष्कर्ष आणि डिसले यांचा दावा याची पडताळणी एबीपी माझानं केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. सोलापूरच्या विज्ञान केंद्रात रणजितसिंह डिसले यांनी काम केल्याची माहिती क्यूरेटर राहुल दास यांनी दिली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेनं विज्ञान केंद्राला एक पत्र दिलं असून त्यात डिसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा तपशिलही देण्यात आला आहे. त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमध्येही डिसले यांनी काम केल्याची माहिती महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. 

कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला त्याचा पगार स्वत: काढता येत नाही

आधी गैरहजेरी नंतर आता वेतन आणि खर्चाच्या विवरणाचा डिसले यांच्यावरील आरोप खोटा निघाला आहे. मुळात कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला त्याचा पगार स्वत: काढता येत नाही. अशात प्रशासनाचा हा आरोपच मुळात हास्यास्पद वाटत आहे. डिसले यांच्या प्रशासकीय चुका कशा झाल्या, याची चौकशी करुन त्यांच्याकडून पगारापोटी घेतलेले 17 लाख वसूल करण्याचा शिक्षण विभागाचा इरादा आहे. दुसरीकडे या सरकारी कारवाई आणि चौकशीला कंटाळून डिसलेंनी राजीनामा धाडलेला आहे. एका प्रयोगशील शिक्षकाची किंमत परदेशातल्या लोकांनी ओळखली आपण मात्र तो कुठे चुकला हेच हेरुन  त्याला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही आहोत. प्रयोगशीलतेला टाचेखाली चिरडण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरु  असल्याचं दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 27 March 2025 : 7 PMGirish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?Waghya Statue Issue | वाघ्याा कुत्र्याच्या स्मारकावरुन संभाजीराजे एकाकी? राऊत काय म्हणाले?Top 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 27 March 2025 : 6 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
Embed widget