एक्स्प्लोर

विज्ञान केंद्रात डिसले गैरहजर असल्याची प्रशासनाची माहिती चुकीची, ABP माझाकडून अहवालातील आरोपांची पडताळणी

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या फेरतपासणी अहवालातील निष्कर्ष खोटा असल्याचा दावा डिसले यांनी केला आहे. समितीचा निष्कर्ष आणि डिसले यांचा दावा याची पडताळणी एबीपी माझानं केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली

Ranjitsinh Disale News : ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर होते असा ठपका जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या फेरतपासणी अहवालात ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे हा निष्कर्ष खोटा असल्याचा दावा डिसले यांनी केला आहे. समितीचा निष्कर्ष आणि डिसले यांचा दावा याची पडताळणी एबीपी माझानं केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या विज्ञान केंद्रात रणजितसिंह डिसले यांनी काम केल्याची माहिती क्यूरेटर राहुल दास यांनी दिली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेनं विज्ञान केंद्राला एक पत्र दिलं असून त्यात डिसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा तपशिलही देण्यात आला आहे. त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमध्येही डिसले यांनी काम केल्याची माहिती महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फेरतपासणी केलेल्या अहवालात डिसले हे विज्ञान केंद्र आणि सिंहगड इन्स्टिट्युट या ठिकाणी देखील उपस्थित होते याबाबत कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाहीत असे निष्कर्ष नोंदवलेत. मात्र यातील प्रत्येक निष्कर्ष हा खोटा असल्याची प्रतिक्रिया डिसले यांच्या वतीने देण्यात आली. समितीच्या या निष्कर्षाची आणि डिसले यांच्या दाव्याची पडताळणी एबीपी माझाने केली, त्यावेळी वेगळीच माहिती समोर आली.  विज्ञान केंद्रात रणजितसिंह डिसले यांनी काम केल्याची माहिती क्यूरेटर राहुल दास यांनी दिली आहे. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटमध्येही डिसले यांनी काम केल्याची माहिती महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीसांचं डिसले गुरुजींना बोलावणं

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रणजितसिंह  डिसले गुरुजींना (Ranjitsinh  Disale Guruji) भेटण्यासाठी बोलावलं आहे. भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी डिसले गुरुजींना याबाबत फोन केला होता.  डिसले गुरुजी आज देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती आहे. 
 
रणजितसिंह डिसलेंवर काय ताशेरे आहेत 
  
रणजितसिंह डिसले प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी एक ही दिवस हजर नव्हते

प्रतिनियुक्तीवेळी केवळ सही पुरता कारभार सोपवून नियमबाह्य आर्थिक व्यवहार 

डिसले यांच्या खुलाश्यात त्यांनी ऑनलाईन काम केल्याचे दिसते 

मात्र ऑनलाइन काम करण्यासंदर्भात कोणतेही आदेश नाहीत

डिसलेंना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रमाचा लाभ द्यायचा होता

मात्र डिसलेंनी देशाबाहेरील विद्यार्थ्यांना शिकवून कराराचे उल्लंघन केले

एन्ट्री मस्टर, उपस्थिती पत्रक, शेरे बुक यापैकी कोणत्याही अधिकृत हजेरी पत्रकावर डिसले यांची नोंद नाही

डिसलेंकडून सगळ्या आरोपांचा इन्कार
रणजितसिंह डिसलेंनी या सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे  यातली प्रत्येक बाब खोटी आहे.  अहवाल बाहेर कसा आला?  ज्यावेळी मला विचारणा होईल, त्यावेळेस खुलासा दिला जाईल. मला अहवाल अद्याप दिलेला नाही, असं त्यांच्याकडून कळलं आहे.  

डिसले यांच्या प्रशासकीय चुका कशा झाल्या. याची चौकशी करुन त्यांच्याकडून पगारापोटी घेतलेले 17 लाख वसूल करण्याचा शिक्षण विभागाचा इरादा आहे. आणि दुसरीकडे या सरकारी कारवाई आणि चौकशीला कंटाळून  डिसलेंनी राजीनामा धाडलेला आहे. एका प्रयोगशील शिक्षकाची किंमत परदेशातल्या लोकांनी ओळखली आपण मात्र तो कुठे चुकला हेच हेरुन  त्याला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही आहोत. प्रयोगशीलतेला टाचेखाली चिरडण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरु  असल्याचं दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget