![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव साहेब तुम्ही माझी हकालपट्टी केली नाही, मी माझ्या मनातून तुम्हाला काढलं : रामदास कदम
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : रामदास कदम यांची शिवसेनेनं हकालपट्टी केली. 'उद्धव साहेब तुम्ही हकालपट्टी केली नाही, मी माझ्या मनातून तुम्हाला काढलंय', अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिलीय.
![उद्धव साहेब तुम्ही माझी हकालपट्टी केली नाही, मी माझ्या मनातून तुम्हाला काढलं : रामदास कदम Ramdas Kadam Exclusive Interview Uddhav Thackeray you didn't expel me i have resigned I removed you from my mind says Ramdas Kadam उद्धव साहेब तुम्ही माझी हकालपट्टी केली नाही, मी माझ्या मनातून तुम्हाला काढलं : रामदास कदम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/19/af64672b45f079675a15a98878c06b6a1658216001_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : शिवसेनेनं रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली. यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम ओक्सोबोक्शी रडले. हकालपट्टी केल्याचं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. 'उद्धव साहेब तुम्ही हकालपट्टी केली नाही, मी माझ्या मनातून तुम्हाला काढलंय', अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिलीय. 'एबीपी माझा'सोबत खास बातचीत करताना रामदास कदम यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करण्याचं आवाहन केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप केलाय.
'आज बाळासाहेब जिवंत असते तर...'
दरम्यान यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला आहे. 'आज बाळासाहेब जिवंत असते तर... ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष करुन हिंदुत्व उभं केलं, हिंदुह्रदयसम्राट म्हणून पदली मिळवली त्या बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करु दिली असती का', असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे.
पाहा : रामदास कदम यांची संपूर्ण एक्सक्लूझिव मुलाखत
'उद्धव साहेब, आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात'
रामदास कदम यांनी हकालपट्टीवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'उद्धव साहेब आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात. 51 आमदारांची हकालपट्टी केली. उद्या 12 खासदार जातील त्यांची हकालपट्टी कराल. शेकडो नगरसेवकाची हकालपट्टी केली. आता मातोश्रीवर बसून तुम्हांला केवळ हकालपट्टी करणं एवढंच काम राहिलं आहे का? ही परिस्थिती का आली याचं आत्मपरिक्षण करा', असं आवाहन रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना केलं आहे.
रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
रामदास कदम यांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'आदित्य ठाकरेंचं वय काय? ते आमदारांना काय बोलतात? त्यांनी थोडं तरी भान ठेवा. आदित्य ठाकरे यांनी गुवाहाटी गेलेल्या आमदारांबाबतच वक्तव्य चुकीचं.'
'शरद पवार शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले'
शरद पवार शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, असा आरोप कदम यांनी केला आहे. बाळासाहेब असताना जे शरद पवारांना जमलं नाही ते पवारांनी उद्धवजींनासोबत घेऊन केलं आणि डाव साधला. नशीब अडीच वर्षात हे थांबलं, पाच वर्षात शिवसेना पूर्णच संपली असती.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)