एक्स्प्लोर

'रिपाइं कार्यकर्ते मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील', रामदास आठवलेंचं राज ठाकरेंना आव्हान

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी (RPI Ramdas Athawale) आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray)  आव्हान दिलं आहे.

Ramdas Athawale On Raj Thackeray :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी (RPI Ramdas Athawale) आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray)  आव्हान दिलं आहे. अजानला विरोध करणं चुकीचं असून राज ठाकरे समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. तसंच रिपाईंचे कार्यकर्ते 3 मे रोजी ठिकठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील, असंही रामदास आठवले म्हणालेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी देऊ नका, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.. आठवलेंच्या या वक्तव्यांमुळे आता मनसे विरुद्ध रिपाइं असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि मनसे यांच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंच्या भेटीही घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, भाजप आणि मनसेची युती शक्य नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत. राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला परवडणारं नाही. तसंच रिपाइं सोबत असताना भाजपला मनसेशी युती करण्याची गरजच नाही, असंही आठवले म्हणालेत.

अजान काही मिनिटांची असते,  त्यामुळे कोणाला त्रास होत नाही

रामदास आठवले म्हणाले की,  अजानला विरोध करणे चुकीचे आहे. अजान काही मिनिटांची असते.  त्यामुळे कोणाला त्रास होत नाही, असं आठवले म्हणाले. 

राज ठाकरेंसोबत भाजपची युती अशक्य

रामदास आठवले म्हणाले की,  मुंबई महापालिकेत भाजपसोबत युती करणार आहे.  सत्ता आली अंतर आरपीआयला उपमहापौरपद मिळावे. राज ठाकरेंसोबत भाजपची युती अशक्य आहे. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत राज ठाकरे इथे येऊ शकत नाहीत. राज ठाकरेंना सोबत घेणं हे भाजपला परवडणारे नाही, असं आठवले म्हणाले.  राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी देऊ नये. राज ठाकरे समाजात तेढ निर्माण करत आहेत, असंही ते म्हणाले. 

आठवले म्हणाले की, शरद पवारांमुळे जातिवाद वाढला असं माझ मत नाही. पण पवारांच्या सोबतचे काही लोक जातिवादी आहेत. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत गरळ ओकण्याचं काहीच कारण नाही.

रामदास आठवले म्हणाले की,  महाराष्ट्रात राष्ट्रपती राज्यवट लागू करावी अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. त्यामुळे आज राणा दाम्पत्याची मागणी योग्य, पण केंद्र सरकार तसे करणार नाही. महाराष्ट्र पोलीसांनी सरकारच्या दबावात राहून काम करू नये,जे लोक घेराव घालत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Embed widget