एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आठवले 8 वर्षानंतर दिल्लीच्या शासकीय बंगल्यात?
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिपदाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर रामदास आठवले यांना दिल्लीत मनाजोगता शासकीय बंगला मिळाल आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून नव्या महाराष्ट्र सदनातला त्यांचा तळ हलण्याची शक्यता आहे.
11, सफदरजंग रोड हा दिल्लीतल्या टाईप-8 चा बंगला आठवलेंना देण्यात आला आहे. पर्यावरणमंत्री अनिल दवे यांचं निधन झाल्यानंतर हा बंगला रिकामा झाला होता.
आठवलेंची एनडीएकडून 3 एप्रिल 2014 रोजी राज्यसभेवर निवड झाली होती. पण खासदार झाल्यानंतरही त्यांचा शासकीय बंगल्यात प्रवेश झाला नव्हता. कारण ज्येष्ठतेनुसार बंगला मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.
आठवलेंची खासदारकीची मुदत संपल्यानंतर 2009 मध्ये त्यांचं सामान दिल्लीतल्या बंगल्यातून बाहेर टाकलं गेलं होतं. तेव्हा आठवले शिर्डीतून लोकसभा निवडणूक हारले आणि दिल्लीत यूपीएचं सरकार होतं.
वारंवार नोटीस देऊनही बंगला रिकामा होत नसल्याने ही कारवाई केल्याचं प्रशासनाचं म्हणणं होतं. तर आठवलेंनी मात्र आपण महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर तिसऱ्या पर्यायाची स्थापना केल्याने ( रिडालोस) राजकीय आकसाने ही कारवाई केल्याचा आरोप केला होता.
बंगल्यातलं सामान बाहेर टाकलं जात असताना आठवले तिथे उपस्थित नव्हते. मात्र त्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतल्या नवीन कार्यालयाची नासधूस करुन आपला संताप व्यक्त केला होता.
एनडीचं सरकार आल्यानंतर आठवलेंना मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी 2 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आता दिल्लीतल्या अगदी मनाजोगत्या शासकीय बंगल्यासाठीची त्यांची 8 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली, असं म्हणायला हरकत नाही.
अर्थात याआधी आठवलेंनी अनेक बंगले अनेक कारणांमुळे नाकारले होते. माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा, ई अहमद, शिवाय विजय दर्डा यांचे रिकामे झालेले बंगले आठवलेंना देण्यात आले होते. पण कधी बंगल्यामध्ये पुरेशी हिरवळ नाही म्हणून, तर कधी बंगल्याचं स्थान अडचणीचं वाटल्याने आठवलेंनी नाक मुरडलं होतं. पण आता मनासारखा बंगल्या मिळाल्याने आठवलेंचा महाराष्ट्र सदनातला मुक्काम आता लवकरच 11, सफदरजंग रोड इथे स्थलांतरित होईल, अशी आशा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement