एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Raju Shetti : सातबारा कोरा करा, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करू; राजू शेट्टी यांचा सरकारला थेट इशारा! 

Raju Shetti : सरकारच्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीये. म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

Washim News वाशिम: हरित क्रांतीच्या माध्यमातून देशाला अन्नधान्यात समृद्ध करणाऱ्या दिवंगत वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्याच राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणं हे देशासाठी लांच्छनास्पद आहे. सरकारच्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीये. म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी राजू शेट्टी  (Raju Shetti)  यांनी केली असून यासाठी त्यांनी वाशिम जिल्ह्यातून दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा केलीये. या आंदोलना अंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन राष्ट्रपतींना दिले जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी

दिवंगत वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती करून महाराष्ट्राला कृषीप्रधान राज्य बनवले. मात्र त्याच देशामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हे लांछनास्पद आहे. महिन्याला जवळपास 240 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठं कर्ज आहे. म्हणून या कर्जाची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा. यासाठी स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात आज पासून सुरू केल्याची घोषणाही राजू शेट्टी यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही राष्ट्रपतींच्या नावे प्रत्येक शेतकऱ्याचे एक निवेदन संकलित करणार आहोत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांना गावबंदी केली जाईल. असा  इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यांमध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन राज्यभरात केले जाईल असेही ते म्हणाले आहे.  

 हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे. या निमित्त आज राज्यात  कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष  राजू शेट्टी यांनी वसंतराव नाईक यांच्या जन्म गाव गहुली इथं जाऊन वसंतराव नाईक  यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आज पासून  कर्जमुक्ती  अभियान यात्रेला सुरवात केलीय. त्यावेळी ते बोलत होते. 

कोणाचे पाय चाटून राजकारण करायचं नाही

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना भाजप कडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावर भाष्य करताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की, कोणाला उमेदवारी दिली आणि कोणाला नाही दिली याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. त्यामुळं कुणाचे पाय चाटून आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही आमच्या मेहनतीवर लढून राजकारण करायचं म्हणून आम्ही स्वबळावर लढलो आणि लढणार आहोत. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बोलताना व्यक्त केले आहे. 
 
इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP MajhaMaharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Embed widget