एक्स्प्लोर
जेलमध्ये फिल्मी राडा, हिमायत बेगचे राजेश दवारेच्या डोक्यात पळीने वार

नागपूर : युग चांडक हत्याप्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी आरोपी राजेश दवारे आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग यांचा जेलमध्ये राडा झाला. हिमायत बेगने राजेश दवारेला नागपूर जेलमध्ये मारहाण केली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये जेवण वाढण्यावरून हा वाद झाला. या वादाचं पुनर्वसन मारहाणीत झालं. यावेळी हिमायत बेगला पुण्यातल्या 5 महिलांच्या हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोप जितेंद्रसिंह तोमरनेही साथ दिली. जितेंद्रसिंह तोमर आणि हिमायत बेगने राजेश दवारेला मारहाण केली. हिमायतने रागाच्या भरात भाजी वाढण्याच्या पळीने राजेश दवारेच्या डोक्यात वार केला. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात हिमायत बेग आणि जितेंद्रसिंह तोमर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























