एक्स्प्लोर
..म्हणून पंकजा मुंडेंनी जलसंधारण खातं गमावलं?
उस्मानाबाद : जलयुक्त शिवाराचं श्रेय घेणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचं जलसंधारण खातं का काढून घेण्यात आलं, याचं उत्तर जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मुलाखतीतून मिळत आहे.
जलयुक्त शिवार योजनेत अनेक ठेकेदार घुसले आहेत. ते जनतेच्या पैशाची लूट करत आहेत, ही बाब राजेंद्रसिंह यांनी पंकजा मुंडेंना वेळोवेळी लक्षात आणू दिली. पण पंकजा मुंडेंनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असा दावा राजेंद्रसिंह यांनी केला.
इतकंच नाही तर राजेंद्रसिंह स्वत: पुराव्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चारवेळेस भेटले. त्यामुळेच पंकजा मुंडेंकडील खातं काढून घेण्यात आलं असावं, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.
सध्या राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खातं आहे, मात्र परिस्थिती बदलली नसल्याचं राजेंद्रसिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ज्या उत्साहात जलयुक्त शिवार योजना सुरु झाली, तो उत्साह मावळताना दिसत असल्याची खंत राजेंद्र सिंहांनी व्यक्त केली.
जलयुक्त शिवारमध्ये सध्या तीन गोष्टी करण्याची गरज आहे. एक म्हणजे - आतापर्यंत आपण काय शिकलो? दुसरं - यातून किती यश मिळालं? आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे, असा सल्ला राजेंद्रसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.
तसंच जलयुक्त शिवारसारख्या कार्यक्रमासाठी स्वत:ची इच्छा असल्यामुळेच मी सहभागी झालो. पाण्यासाठी जी लोकं काम करु इच्छीतात त्यांना एकत्र करुन त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची गरज असल्याचं राजेंद्र सिंह म्हणाले.
भारतात असं कोणतंही राज्य नाही, ज्याने पाण्यासाठी लोकांकडून पैसे जमा केले. मात्र महाराष्ट्रात ते घडलं, लोकांनी 350 कोटी रुपये जलयुक्त शिवारासाठी दिल्याचं राजेंद्र सिंह यांनी सांगितलं.
जलयुक्त शिवारमध्ये पुन्हा उत्साह यावा, यासाठी मी प्रयत्न करत आहे. सध्या कोणत्याही जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचं काम सुरु नसल्याचंही राजेंद्र सिंह यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement