एक्स्प्लोर
राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील विक्रोळीत सभा घेतल्यानंतर विलेपार्लेमध्येही दुसरी सभा घेतली. इथे राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देत, तुम्ही मुंबईतली कामं सांगा, मी नाशिकची कामं त्याच व्यासपीठावर सांगतो, असं आव्हान दिलं.
''मुंबईत शिवसेनेची 25 वर्षांपासून सत्ता आहे.
शिवसेनेला 25 वर्षात जमलं नाही, ते मनसेने नाशिकमध्ये पाच वर्षात करुन दाखवलं.
त्यामुळे मुंबईची कामं एका बाजूला मांडा आणि नाशिकची कामं मी एका बाजूला मांडतो.
हिंमत असेल तर आव्हान स्विकारा'', राज ठाकरे
दरम्यान विलेपार्लोतील सभेपूर्वी राज ठाकरेंनी विक्रोळीत सभा घेतली. तिथेही त्यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार तोफ डागली. शिवसेनेने भ्रष्टाचार केला आहेच. पण त्यांच्यासोबत भाजपही सत्तेत आहे, त्यामुळं त्यांना शिवसेनेला बोलण्याचा हक्क नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवरही हल्ला चढवला.राज ठाकरेंचा पहिल्याच प्रचार सभेत झंझावात, भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल
विक्रोळीतील सभेत शिवसेनेवर हल्ला सरकारकडे पैसा नाही, पण लोकांना आकर्षित करण्यासाठी केवळ जाहिरातबाजी सुरु आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तर मुंबई महापालिकेत केवळ आकडे दाखवले जातात, पण पैसा जातो कुठं ते कुणाच्याही लक्षात येत नाही, असा आरोप त्यांनी केला.''मुंबईत 100 कोटी रुपये दरवर्षी फक्त खड्डे बुजवायला दिले जातात.
खड्डे बुजवायला एवढे पैसे देणारी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे'',
राज ठाकरे.
मुंबईत शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल. पण भाजपही त्यांच्यासोबत सत्तेत आहे. शिवसेनेवर टीका करण्याचा भाजपला अधिकार नाही. भाजपच्या खिशात काही तरी गेलचं असेल ना, असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिवाय शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाखाली भ्रष्टाचार दडवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगल्यावर डोळा असल्याची टीकाही त्यांनी केली.''एका राज्याएवढं बजेट मुंबई महापालिकेचं आहे.
शिक्षण खात्यासह सर्वच खात्यांची अवस्था वाईट आहे.
मुंबईत मराठी शाळा बंद होऊन, उर्दू शाळांची संख्या वाढायला लागलीय.
कुणाची संख्या वाढतीये आणि कुणाच्या राज्यात हे होतंय, याचा विचार करावा'',
राज ठाकरे.
मुंबईत आज खेळायला मैदान नाही. पण यांनी स्वतःच्या नावाने क्लब उभे केलेत. त्यातून ते बक्कळ पैसा कमावत आहेत. मग मुंबईकरांच्या हाताला काय लागलं, असा सवाल राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपला केला.... म्हणून प्रचाराला उशिरा सुरुवात, राज ठाकरेंच्या विक्रोळीतील सभेतील महत्वाचे मुद्दे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement