एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

प्रचारतोफांवर पावसाचा मारा, अनेक जिल्ह्यात मुसळधारा, बळीराजाचं मोठं नुकसान, सांगलीत ऊसशेती भुईसपाट

सांगली जिल्ह्यातील मिरजेत सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाने मिरज शहरातील रस्त्यावरील झाडे मुळासकट उखडून नुकसान झाले.

सांगली : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंड होण्यापूर्वीच पावसामुळे विझल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राजकीय नेत्यांनी (Election) आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भरपावसातही वातावरण तापतं ठेऊन सांगता सभा गाजल्या. राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार (Rain) पावसाने हेजरी लावली. त्यामध्ये, पुणे, सातारा, सांगली (Sangli), बेळगाव, मिरज, बीड, सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकटाडही ऐकायला मिळाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजांच्या ताराही तुटल्या आहेत. 

सांगली जिल्ह्यातील मिरजेत सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाने मिरज शहरातील रस्त्यावरील झाडे मुळासकट उखडून आणि झाडांच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज तारा जागोजागी तुटल्याने शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्या कटींग करणारे मशीन आणून रिक्षा बाहेर काढल्या. येथील तीन रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे. 

घरात शिरले पाणी

मुळासकट झाड पडून काही ठिकणी रस्ता पूर्ण बंद झाला आहे. जागोजागी वीज तारा तुटल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. शास्त्री चौक, अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घरात  शिरले. मिरज अग्निशमन दलाचे जवान  झाडे पडलेल्या ठिकाणी जाऊन युद्ध पातळीवर मदतकार्य करत आहेत.

शेतीचं मोठं नुकसान, ऊसशेती भुईसपाट

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला अचानक आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्याच्या गारपीटीने सर्वानाच झोडपले होते. या परिसरातील ऊस शेती  भुईसपाट झाली आहे. भाजीपाल्याचे तर फार मोठे नुकसान झाले असून कुरळप येथील विजय पाटील यांचा काढणीला आलेला दोन एकर डागर भोपळा हाता-तोंडाला आलेल्या गारपिटीमुळे फुटला आहे.त्यांचे फार मोठे नुकसान झाले. तसेच कुरळप  येथील तानाजी पाटील या शेतकऱ्याचे दोडक्याचे ही नुकसान झाले आहे. ऊसशेती भुई सपाट झाली असून उसाची पाने गारेमुळे चिंधाडली आहेत. त्यामुळे, शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.

बेळगावात 1 तास मुसळधार

बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी  अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून उष्म्यात वाढ झाली होती, उकाड्याने जनता हैराण झाली होती.सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते, त्यामुळे उष्मा प्रचंड वाढला होता.सव्वा चार वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला.काही वेळात पावसाचे थेंब पडण्यास प्रारंभ झाला आणि लगेच मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. एक तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून सुखद गारव्याची अनुभूती मिळाली. मात्र, शेतीपिकांचे नुकसान झालं आहे. 

बेळगाव शहरात जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साठले होते. गटारींची साफसफाई झालेली नसल्याने गटारी तुंबून रस्त्यावर पाणी वाहत होते.शनिवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने खरेदीसाठी आलेल्या जनतेची तारांबळ उडाली. रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या भाजी व्यापाऱ्यांना देखील आसरा शोधावा लागला. 

11 ते 15 जूनपर्यंत येलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड  जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 11 ते 15 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget