एक्स्प्लोर

RSS च्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आरोप फेटाळले!

भिवंडी कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतील. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी याबाबत माहिती दिली.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आरोप फेटाळले. भिवंडी कोर्टात आज सुनावणी पार पडली. आपल्यावरील आरोप मान्य नाहीत, असे राहुल गांधींनी कोर्टात सांगितले. मात्र राहुल गांधींवर दोषारोपपत्र ठेवून खटला चालवला जाणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे. अवमान याचिकेवरील सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर होते. प्रकरण काय आहे? महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. आज कोर्टात काय झालं? काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कोर्टात उपस्थित राहिल्यानंतर कार्यवाहीला सुरुवात झाली. यावेळी राहुल गांधींनी आपल्यावरील आरोप फेटाळले आणि खटल्यासाठी तयार आहे, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर दोषारोपपत्र ठेवून खटला पुढे चालवला जाईल. या खटल्यावर येत्या 10 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. विचारधारेसाठी लढाई – राहुल गांधी असे खटले होत राहतील. मात्र माझी लढाई विचारधारेसाठी सुरु आहे आणि ती नक्की जिंकू, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले. याचिकाकर्ते कुंटे नाराज राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विशेष वागणूक दिली गेली. मी याचिकाकर्ता असूनही मला कोर्ट रुममध्ये प्रवेश दिला गेला नाही, मात्र राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते आत गेले होते. पोलिस एकांगी भूमिकेत दिसत होते, असे म्हणत याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी नाराजी व्यक्त केली. LIVE UPDATS : - भिवंडी कोर्टातील राहुल गांधींशी संबंधित सुनावणी संपली, पुढील सुनावणी 10 ऑगस्टला - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात आरोप निश्चित, भिवंडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल  - भिवंडी न्यायालयात राहुल गांधी उपस्थित, न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा RSS च्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आरोप फेटाळले! - महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, भाई जगताप, जनार्दन चांदुरकर, राजू वाघमारे यांच्यासह मुंबतील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचे स्वागत केले - राहुल गांधी मुंबईत दाखल RSS च्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आरोप फेटाळले! कसा असेल राहुल गांधींचा मुंबई दौरा? भिवंडी कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतील. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी याबाबत माहिती दिली. दुपारी सव्वा तीन वाजता राहुल गांधींची गोरेगावमध्ये सभा होईल. काँग्रेसकडून ऑफलाईन आणि ऑनलाईन कॅम्पेन सुरु करण्यात येत आहे, ज्याचं नाव प्रोजेक्ट शक्ती असं आहे. याचं अनावरण राहुल गांधी करतील आणि एक व्हिडीओ रिलीज करतील. प्रत्येक बूथ कार्यकर्ता त्यांचं व्होटर आयडी राहुल गांधी यांना पाठवतील तीन प्रकारचं साहित्य कार्यकर्त्यांना दिलं जाणार आहे. फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या असणाऱ्या गोष्टी पुस्तकाच्या रुपात दिल्या जाणार आहेत. यात पंकजा मुंडे, गिरीश बापट, रवींद्र वायकर, एकनाथ खडसे, विष्णू सावरा, दीपक सावंत, विनोद तावडे, तसेच चहा घोटाळा, उंदीर घोटाळा, समृद्धी घोटाळा याचा या पुस्तकात समावेश असेल. मोदी सरकार चार वर्षात कसं अपयशी ठरलं हे पुस्तक कार्यकर्त्यांना दिलं जाणार आहे, ज्याचं नाव विश्वासघात असं आहे. तिसरं डॉक्युमेंट मुंबई महापालिकेवर असेल, जे चार पानांचं आहे. रस्ते, नालेसफाई, शिक्षण, आरोग्य या विषयांचा त्यात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Rana Suryavanshi Baramati Crime: उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; करमाळ्यातील नवनाथ झोळ बारामती पोलिसांच्या ताब्यात, नेमकं कारण काय?
उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; करमाळ्यातील नवनाथ झोळ बारामती पोलिसांच्या ताब्यात, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Embed widget