एक्स्प्लोर
भाजपने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हे, ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ घडवला : विखे पाटील
आपल्या जाहिरातीसाठी छत्रपतींचे होर्डिंग उतरवण्याचं काम सरकारने केले असून, आगामी निवडणुकीत जनता यांना सत्तेतून खाली उतरवेल, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.
शिर्डी : भाजप सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हे, ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ घडवला, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. लोणी येथे शिवजयंती समारोहानंतर विखे पाटील यांनी अनेक मुद्यांच्या आधारे सरकारवर जोरदार तोफ डागली.
मुंबईतील ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “आज संपूर्ण राज्यात निराशेचे वातावरण आहे. शेतकरी, व्यापारी, कामगार, तरुणाई अशा सर्व घटकांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर भाजपचा मित्रपक्ष शिवसेना तसेच एकनाथ खडसे, आशिष देशमुखांसारखे भाजप नेतेसुद्धा नैराश्याने ग्रासलेले आहेत. भाजपच्या कार्यकाळात महाराष्ट्र ‘फ्रस्ट्रेटेड’ झाल्याचा यापेक्षा अधिक उत्तम उदाहरण कोणते असू शकते?”
मराठीला अभिजात दर्जावरुन सरकारवर निशाणा
एक बाजूला मराठी साहित्य संमेलन बडोद्यात सुरु असताना, दुसरीकडे त्याच मराठी भाषेचा केंद्राकडून अवमान होतोय, याचं सरकारने स्पष्टीकरण गरजेचं आहे. गेली तीन वर्षे राज्य सरकारकडून अभिजात दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत जनतेची दिशाभूल केली जात असून केंद्रीय गृहमंत्र्याचं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अपयश असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
जनता या सरकारला सत्तेतून खाली उतरवेल : विखे पाटील
“आज शिवजयंती असल्यानं काल पंतप्रधानांनी शिवस्मारकासंदर्भात केलेलं वक्तव्य, मात्र यावेळी आंबेडकर स्मारक कधी होईल, याचा उल्लेख त्यांनी टाळला आहे. केवळ राजकीय सोयीसाठी महापुरुषांच्या नावाचा भाजपाकडून वापर सुरु असून आपल्या जाहिरातीसाठी छत्रपतींचे होर्डिंग उतरवण्याचं काम सरकारने केले. आगामी निवडणुकीत जनता यांना सत्तेतून खाली उतरवेल.”, असा इशारा यावेळी विखे पाटील यांनी दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement