एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार बांधील, पण महाविकास आघाडीला भीती, विखे पाटलांचा निशाणा 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) महाविकास आघाडीत भीती बसली असल्याचं मत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं.

Radhakrishna Vikhe Patil : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) महाविकास आघाडीत भीती बसली आहे. कारण, लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करुन बसली आहे. या योजनेवरुन कोणी कितीही टीका केली तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमचे सरकार बांधील असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका देखील केली. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. तर सुप्रिया सुळे यांनी योजनेचा पहिला हफ्ता बँकेत जमा झाला आहे, तो सर्व बहिणींनी लवकर काढून घ्यावा नाहीतर भाजपचा एक नेता म्हणाला आहे की, पैसे परत घेतले जातील. असं म्हणत या योजेवरून सरकारवर टीका केली होती. याबाबत पालकमंत्री विखेंना विचारले असता त्यांनी मविआ नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

बारामतीत सुनेत्रा पवारांना लोकसभेला उभे केले हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत असल्याची’चर्चा असल्याचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलं होतं. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी वक्तव्य करणं थोडं थांबवलं पाहिजे. प्रत्येक वेळी अपरिपक्तवतेचं विधान येतं आहे. ते स्वतःच हसू करुन घेत असल्याचा टोला राधाकृष्ण विखे यांनी लगावला.

नितेश राणेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले विखे पाटील?

पोलिसांना लय मस्ती चढली असेल तर त्याला अशा ठिकाणी पाठवू की बायकोलाही फोन करता येणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी काय वक्तव्य केले मला माहित नाही. मात्र, प्रत्येक नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे थांबवले पाहिजे असं विखे पाटील म्हणाले. असं वक्तव्य केलं असेल तर त्याच समर्थन कोणी करणार नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.

विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण 

देशभरात आज 78 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अहमदनगर येथे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात देशात सरकारच्या वतीने राबवल्या जात असलेल्या योजना सांगितल्या. तसेच सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलातील  विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या:

लाडकी बहिण योजनेचे पैसे यायला सुरुवात, पहिल्या टप्प्यात किती महिलांना मिळणार लाभ? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Embed widget