एक्स्प्लोर

Pune Weather Update : पुण्यावर वरुणराजा रुसला? अपेक्षेपेक्षा कमी पाऊस, चार धरणं मिळून फक्त 10 TMC पाणीसाठा

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलाच जोर धरला असला तरीही पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

Pune Weather Update : राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलाच जोर धरला असला तरीही पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या क्षेत्रांकडे पावसानं पाठ फिरवली आहे. चारही धरणांमध्ये मिळून सध्या फक्त दहा टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात या चारही धरणांमध्ये मिळून जवळपास 18 ते 19 टीएमसी पाणीसाठा होता. पण आता  ही धरणं 50 टक्केही भरलेली नाहीत. 

खडकवासला धरणक्षेत्रामध्ये रिमझिम पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस डोंगरमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 जुलै घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 आणि 23 जुलै रोजी पुण्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. याच कालावधीत घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत...

राज्यभर अनेक ठिकाणी मुसळधार रा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शहरं पाण्याखालीदेखील गेली आहे. मात्र पुण्यात अजूनही हवा तेवढा पाऊस झाला नाही आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच चिंतेत पडला आहे. अनेकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे यंदा बळीराजाचं होणार?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

लोणावळ्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळला, चिंता मात्र कायम

पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग दिवशी विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासांत इथे तब्बल 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 48 तासांत तब्बल 434 मिमी पाऊस कोसळला आहे. असं असलं तर यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊस हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2592 मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ 1744 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे. जी शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

राज्यात काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेन्ज अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 | टॉप 25 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaSunil Prabhu VS Uday Samant |  मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई! नालेसफाईवरून सत्ताधारी विरोधक भिडलेVitthal Darshan | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पंढरपुरातील VIP दर्शन बंद ABP MajhaMajha Vitthal Majhi Wari | माझा विठ्ठल माझी वारी! माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Embed widget