एक्स्प्लोर

Pune double decker bus : पुणेकरांना नव्या वर्षाचं भन्नाट गिफ्ट! मुंबईपाठोपाठ पुण्यातही धावणार 'डबल डेकर' बस?

Pune double decker bus :  पुणेकरांना नव्या वर्षात पीएमपीएमएलकडून खास गिफ्ट मिळणार आहे. पुण्यात डबल डेकर बस धावण्याची शक्यता आहे.

Pune Double Decker Bus : पुणेकरांना नव्या वर्षात (New Year) पीएमपीएमएलकडून (PMPML) खास गिफ्ट मिळणार आहे. पुण्यात डबल डेकर (double decker bus) बस धावण्याची शक्यता आहे. पीएमपीएलच्या (पुणे महानगर परिवहन महामंडळ) ताफ्यात पुढील वर्षी येऊ शकतात. पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली आणि त्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबद्दलची माहिती दिली.

मुंबईतील डबल डेकर बसचं पुणेकरांना आकर्षण आहे. पुण्याहून मुंबईत गेलेले नागरिक या बसमधून प्रवास करण्यासाठी उत्सुक असतात. त्याच नागरिकांची उत्सुकता लक्षात घेत पुण्यात "डबल डेकर" बस सुरु होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चा देखील झाली आहे. मुंबईमध्ये डबल डेकर बस धावत आहेत याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत. मात्र पुणेकरांनाही ही बस आवडण्याची शक्यता आहे, असं बकोरिया यांनी सांगितलं आहे. आम्ही मुंबईमधील बेस्टशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर याबद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, असंही बकोरिया यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईप्रमाणे पुण्यात देखील "डबल डेकर बस येणार असल्याची शक्यता आहे. 

ई-बसच्या यशानंतर डबर डेकर

पीएमपीएमएलकडून 2018 मध्ये पुण्यात ई-बस धावली होती. त्यानंतर या बसला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक पुणेकर आता या ई-बसने रोज प्रवास करताना दिसतात. यापूर्वी अनेक शहरात ई-बसचं संचलन सुरु होतं. त्याच शहरांप्रमाणे पुण्यात ई-बस सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला पुणेकरांनी या ई-बसमधून प्रवास केला नाही मात्र आता शेकडो पुणेकर प्रवासासाठी ई-बसचा वापर करताना दिसत आहेत. त्यानंतर शहरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातदेखील ई-बसचं संचलन सुरु करण्यात आलं. त्याप्रमाणे चार्जिंग स्टेशनचीही संख्या वाढवण्यात आली. 

कास पठारावरही ई-बस धावली...

काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कास पठार येथे चार ई-बसचं लोकार्पण करण्यात आलं. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरु करणे, स्थानिकांना रोजगार वाढवण्यासाठी आराखडा तयार करणं यावर चर्चा सध्या प्रशासनामध्ये चर्चा सुरु आहे. मात्र ई-बसेसमुळे कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. 

संबंधित बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेचा नाराजीABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 03 April 2025Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
Embed widget