एक्स्प्लोर

Pune Suicide News : मित्राच्या त्रासाला कंटाळून पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. राज गर्जे असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

Pune Suicide News : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज गर्जे असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. राजच्या मित्रावर राजला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज आणि निरूपम जोशी यांची ओळख होती. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राज यास त्रास देत होता. वेळोवेळी होणार्‍या त्रासाला कंटाळून राजने मंगळवारी गळफास घेवून आत्महत्या केली. 

या प्रकरणी राजच्या घरावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अत्यंत गरीब घरातून आलेला माझा भाऊ असे टोकाचे पाऊल का उचलेल हेच आम्हाला समजत नसून हा मोठा धक्का आम्ही पचवू शकत नाही, अशी खंत राजच्या भावाने व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला, आम्हाला मिळालेल्या स्टेटमेंट वरून हा रॅगिंगचा प्रकार दिसत नाहीये मात्र आम्ही त्या अनुषंगाने देखील या संपूर्ण घटनेचा तपास करत आहोत असे चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी म्हटले आहे.

ज्या वयात मुलं आयुष्याचे नव्या पर्वाची सुरुवात करत असतात, त्याच वयात मात्र राजने स्वतःचं जीवन संपवले. राजने तणावात येऊन हे टोकाचे पाऊल उचलले. आता राजच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या त्याच्या मित्राला आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी काय शिक्षा होईल?, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

तरुणांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचं मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे.  काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (BJ Medical College) अदिती दलभंजन या 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने वाचवण्यात यश आलं नव्हतं. नैराश्यात असल्याने तिने टोकांचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

नैराश्येतून आत्महत्येत वाढ

सध्या पुणे शहरात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक  कारणावरुन अनेक तरुण आत्महत्येचं पाऊल उचलताना दिसत आहे. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. सोशल मीडियामुळे नैराश्य वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी शारिरीक आणि मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात जपावं, असं आवाहन तज्ञांनी केलं आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Embed widget