(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami patil : गौतमी पाटीलवरून पुण्यातील राजकारणातले दोन पाटील एकमेकांत भिडले, म्हणाले...
राज्यभर वादाच्या केंद्रस्थानी असणारी नृत्यांगना गौतमीने आता पाटील आडनाव काढून टाकावे, अशी मागणी होत असतानाच आता गौतमीवरून पुण्यातील दोन पाटील एकमेकांमध्ये भिडले आहेत.
Gautami patil : राज्यभर वादाच्या केंद्रस्थानी असणारी नृत्यांगना गौतमीने (Gautami Patil) आता पाटील आडनाव काढून टाकावे, अशी मागणी होत असतानाच आता गौतमीवरून पुण्यातील दोन पाटील एकमेकांमध्ये भिडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा गौतमीच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते, अशी खोचक टीका खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली. तुम्ही एकनाथ शिंदेंची सभा बघता. त्यांच्या गर्दीची तुलना गौतमीच्या कार्यक्रमाशी करता....असं असलं तरीही आम्ही काही गौतमीची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत करू शकतो. पण आम्ही पवारांना मानणारे आहोत. तेव्हा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी आमदारांनी याचं भान ठेवावं, असा पलटवार शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटलांनी केला. मात्र गौतमीने या दोन्ही नेत्यांच्या वादात न पडण्याचं पसंत केलं आहे. मला महाराष्ट्रातून प्रेम मिळत असल्याचं गौतमी म्हणाली.
चित्रपटसृष्टीतील अनेकांनी आपले नावं बदलले आहेत. गौतमी पाटील तरुण कलकार आहे तिचं करिअर संपवू नका. या महाराष्ट्रात कोणीही पाटील होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेद करु नये. गौतमी पाटील गरीब घरातून पुढे आली आहे. तिच्या कलेच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहचली. तिच्या कार्यक्रमावर देखील बंदी घालतात. तिच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असं असलं तरीही एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालासुद्धा एवढी गर्दी नसते, असा टोला दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. तिच्याबाबतमी लोकांना वेगळी भावना आहे, असंही ते म्हणाले.
आढळराव पाटील यांनी दिलीप मोहिते पाटलांवर चांगलाच निशाणा साधला आहे. दिलीप मोहिते पाटील हे वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार आहे. त्यात ते अज्ञानी आमदार आहे, असं मी समजतो. ते वेड्यांच्या नंदवनामध्ये जगत असतात. कोणतंही कारण नसताना तोंड सुख घेणं, आरोप करणं ही त्यांची जुनी सवय आहे. गौतमी पाटीलची तुलना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणं हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांबाबतच अशी वक्तव्य करणं, हे महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही. त्यामुळे त्यांना शोभेल अशी वक्तव्य करण्याचा सल्ला त्यांनी दिलीप मोहिते पाटलांना दिला आहे. आम्हीदेखील येत्या काळात आम्ही गौतमीच्या कार्यक्रमाची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत करू शकतो पण आम्ही पवारांना मानतो त्यामुळे आम्ही कधीही अशी वक्तव्य करणार नसल्याचं ते म्हणाले.