मोठी बातमी! पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
पुणे -नाशिक शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Pune Nashik High Speech Railway Updates : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnvais)यांनी दिली. फडणवीस यांनी आज अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल
पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची शहर आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे संदर्भात सुधारित आराखड्याचे सादरीकरण आज झाले आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली. तांत्रिक बाबींची पूर्तता करून आता केंद्रीय मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर होईल.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2023
नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद (5 फेब्रुवारी 2023) pic.twitter.com/rAlMrzpwdG
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प प्रकल्पासाठी अनेक भागात भूसंपादन देखील सुरू आहे. याआधीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी या प्रकल्पाविषयी चर्चा केली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा ॲडग्रेड असल्यामुळे त्या ठिकाणी एवढ्या स्पीडनी गाडी घेणं हे जरा कठीण जाईल आणि म्हणून त्यामध्ये रेल्वे कम रोड प्रकल्प अवलंबवण्याची सूचना रेल्वे मंत्र्यांनी केली होती. शिवाय हायस्पीड रेल्वेसाठी हा मार्ग फास्ट ट्रेड असल्याने रेल कम रोड मुळे अधिकाधिक सोयीस्कर होणार आहे.
पुणे- नाशिक हायस्पीड प्रकल्प काय आहे?
नाशिक पुणे रेल्वे हाय स्पीड 235 किमी चा एकूण मार्ग पुणे अहमदनगर नाशिक जिल्हा असा आहे. देशातील सर्वात किफायतशीर अति जलद मार्ग जवळपास 16 हजार कोटी रुपयांचा खर्चाचा प्रकल्प असून यात राज्याचा 3273 कोटींचा हिस्सा आहे. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा दोन जिल्ह्यातून जात असल्याने या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात आहेत. शिवाय ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. पुणे - नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता हा प्रकल्प रेल कम रोड असा असणार आहे.