(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई निशाण्यावर, पुणे ISIS च्या कारवाईचं इपिसेंटर बनतंय का ? आतापर्यंत राज्यभरातून 5 जणांना अटक
Pune ISIS : राष्ट्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी गेल्या एका महिन्यात ISIS आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे.
Pune ISIS : राष्ट्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी गेल्या एका महिन्यात ISIS आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केले. निपाणी, संकेश्वरमध्ये मुक्काम केला. आंबोलीमध्ये बॉम्बचं प्रशिक्षण सुरु असल्याचे समोर आले.
26 नोव्हेंबर 2008 छबाद हाऊसवर हल्ला झालेल्या घटनेला 15 वर्ष उलटली आहे. मुंबईतल्या ज्यूंसाठी हक्काच्या ठिकाणाची अतिरेक्यांनी चाळण केली.. तेच छाबाद हाऊस पुन्हा एकदा अतिरेक्यांचया निशाण्यावर आहे. त्याला कारण ठरलंय संशयित अतिरेक्यांकडे सापडलेला छबाद हाऊसचा फोटो.
सध्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छाबाड हाऊसची Google प्रतिमा राजस्थानमध्ये हल्ल्याचा कट रचल्याबद्दल अटक केलेल्या दोन आरोपींकडून पुनर्प्राप्त करण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांना या सांदरबात कळवले होते, त्यानंतर या केंद्रात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या केंद्रावर पोलिसांकडून मॉकड्रीलही सुद्धा घेण्यात आले होते. एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोघा आरोपींवर NIA कडून पाच लाख रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली होत. त्याचबरोबर हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा तपासात निष्पन्न सुद्धा झालेला आहे.
Mumbai Police beefs up security outside Chabad house (one of the targets of 26/11 terror attack) in Colaba after a Google image of Chabad house was recovered from two accused arrested for planning an attack in Rajasthan: Mumbai Police
— ANI (@ANI) July 29, 2023
Maharashtra ATS had arrested Mohd Imran Mohd…
महाराष्ट्र एटीएसनं पुणे आणि गोंदियातून अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांकडून मिळालेली माहिती, ही अत्यंत धक्कादायक आहे. या चौघांकडे मिळालेलं साहित्य आणि त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे चौघेही एका मोठ्या अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोथरुडमधून दुचाकी चोरताना दोन संशयितांना अटक केली... जेव्हा चौकशी केली... तेव्हा पोलिसांना काही तरी मोठ्या कटाची कुणकुण लागली... पोलिसांनी एटीएसला पाचारण केलं... एटीएस या दोघांना त्यांच्या कोंढव्यातल्या घरी घेऊन गेली... आणि तिथेच या कटाचा भांडाफोड झाला.
एटीएसला घरात ड्रोन कॅमेरा, पेन ड्राईव्ह ,लॅपटॉप, नकाशा आणि फोटो मिळाले. तेव्हा एटीएसला खात्री पटली. की हा एका व्यापक कटाचा भाग आहे.पण त्या फोटोंमध्ये मुंबईतलं छाबाद हाऊस हे एक सर्वात संवेदनशील ठिकाण होतं. अटक केलेल्या चौघांनी पुण्यातल्या कोंढव्यामध्ये आपलं तळ ठोकलं होतं... एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते राहात होते. काही दिवसांपूर्वी ते कोल्हापूरला गेले. तिथून त्यांनी निपाणी गाठलं. एक दिवस निपाणीत मुक्काम केला. निपाणीतून ते संकेश्वरला पोहोचले. तिथून ते सिंधुदुर्गातल्या आंबोलीत गेले. आंबोलीमध्ये जंगलामध्ये टेंट मारला आणि मुक्काम केला. जंगलातच त्यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं.
आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात रतलामचा मोहम्मद युनुस खान, मोहम्मद युसूफ शेख, गोंदियाचा अब्दुल कादिर पठाण आणि रत्नागिरीचा एक तरुण यांचा समावेश आहे. पण रतलामसारख्या मध्यप्रदेशातल्या शहरातून मुंबईमध्ये अतिरेकी कारवाया करण्यासाठी आलेल्यांना नक्की बळ कुठून मिळतं? अल-सुफा ही दहशतवादी संघटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती. राजस्थानच्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले. या संघटनेचे मुख्य लक्ष्य आरएसएसचे सदस्य आणि भाजप नेते असल्याचं तपासात समोर आलंय. एक दशकापूर्वी अल सुफा संघटना प्रकाशात आल्यानंतर सरकारने बंदी घातली होती. मध्यप्रदेशातून येऊन पुण्यात तळ ठोकून कोकणात प्रशिक्षण घेऊन मुंबईवर डोळा ठेवणाऱ्यांचं कनेक्शन आता पुण्यात एनआयएने अटक केलेल्या आयसिस मॉड्युलशीही आहे का? हेही तपासणं सुरु आहे. तसं कनेक्शन समोर आलं तर आता मुंबईही आयसिसच्या निशाण्यावर आहे, असाच त्याचा अर्थ असेल.