(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना अन् लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही; प्राचार्यांना मारहाण, नेमकं काय घडलं?
तळेगावमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही आहेत, असा आरोप झाल्यानंतर आता तिथं ख्रिश्चन समाजाची प्रार्थना का घेतली जाते, असा आरोप बजरंग दलाने केला आहे.
Pune Crime News : तळेगावमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील (Pune Crime News ) लेडीज टॉयलेटमध्ये (Ladies Toilet) सीसीटीव्ही आहेत, असा आरोप झाल्यानंतर आता तिथं ख्रिश्चन समाजाची प्रार्थना का घेतली जाते? असा आरोप बजरंग दलाने केला आहे. हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाणही झाली आहे. या प्रकारामुळं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा, अशी मागणी केली जात आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी झाला आहे.
Pune Crime News : नेमकं काय घडलंय?
पुण्यातील एका महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तळेगावमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. याबाबत काही संघटनांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना जाब विचारला आणि त्यांच्यावर हात ही उचलला आहे. त्यानंतर कपडे फाटलेल्या अवस्थेत असतानाचा त्यांचा व्हिडीओ ही समोर आला. लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावण्यासोबतच विविध आरोप प्राचार्य अलेक्झांडर यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
Pune Crime News : प्राचार्यांची हकालपट्टी करण्याची मागणी
या प्राचार्यांची महाविद्यालयातून तातडीनं हकालपट्टी करावी, अशी मागणीदेखील करण्यात येत आहे. महाविद्यालयात असा गोंधळ उडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसरीकडे मावळ तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगलं आहे. त्यामुळं लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही नेमके कोणत्या कारणासाठी बसवण्यात आले होते? यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही आहे.