एक्स्प्लोर

Pune Crime news : 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने प्रेयसीसोबत राहण्यासाठी रचला स्वतःच्याच हत्येचा बनाव, जिवलग मित्राची हत्या करुन प्रेयसीला भेटण्यासाठी पसार..

Pune Crime news : पुण्याच्या खेड तालुक्यात एका ज्येष्ठाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ज्येष्ठ व्यक्तीन मित्राचं डोकं धडापासून वेगळं करुन त्या मित्राची निर्घृण हत्या केली.

Pune Crime news : पुण्याच्या खेड तालुक्यात (pune) एका ज्येष्ठाने स्वतःच्या (Pcmc) मृत्युचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ज्येष्ठ व्यक्तीने मित्राचं डोकं धडापासून वेगळं करुन त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत:चे कपडे त्या मित्राच्या मृतदेहाला (Crime news) घातले. हा मृतदेह स्वत:चा आहे, असं भासवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुभाष छबन थोरवे असं 65 वर्षीय ज्येष्ठ आरोपीचे नाव आहे. रवींद्र घेनंद असं 48 वर्षीय हत्या केलेल्या मित्राचं नाव आहे. गावापासून लांब जाऊन प्रेयसीसोबत राहण्यासाठी आरोपी ज्येष्ठाने हा पराक्रम केल्याचं दहा दिवसांनी समोर आलेलं आहे. 

पत्नीने आत्महत्या केली अन् यांनी गुण उधळले

सुभाष थोरवेंचे त्यांच्याच शेतात कामासाठी येणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. याची खबर थोरवेंच्या पत्नी आणि मुलांनाही लागली होती. मुलांनी त्यांचा संसार वेगळा थाटला होता. मात्र पत्नीला हे पचनी पडत नव्हतं. यातूनच त्यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. मात्र यातून 65 वर्षीय सुभाष यांनी कोणताही धडा घेतला नाही. उलट या घटनेनंतर त्यांना सगळ्याचं स्वातंत्र्य मिळालं. याचाच फायदा घेत त्यांनी प्रेमसंबंध असणाऱ्या विवाहित महिलेसोबत गावापासून लांब जाऊन राहण्याचा डाव आखला. यासाठीच सुभाष यांनी स्वतः मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचं ठरवलं. . 

कशी केली मित्राची हत्या?

सुभाष थोरवने बैठकीतील रवींद्र घेनंद यांची हत्या करण्याचा कट आखला. 16 डिसेंबरच्या रात्री 9:30 वाजता ते रवींद्रना घेऊन शेतात गेले. तिथं रवींद्र यांना दारु पाजली. ते नशेत असतानाच डोक्यात कोयता घातला. मग डोकं धडापासून वेगळं केलं, स्वतःचे कपडे रवींद्रला घातले आणि ट्रॅक्टरचे राऊटर रवींद्रच्या शरीरावर घातले जेणेकरुन स्वतःचा मृत्यू अपघातातून झाला, असं सुभाष यांनी भासवलं. रवींद्र यांचं डोकं, कपडे, कोयता लगतच्या पडक्या विहिरीत पोत्यात दगड टाकून फेकून दिले अन् तिथून गायब झाला. शेतात आढळलेला मृतदेह वडिलांचा असल्याची कुटुंबियांना खात्री पटली आणि सुभाष यांची पहिली खेळी यशस्वी ठरली. रवींद्र यांच्या मृतदेहावर सुभाष समजून अंत्यविधी ही पार पडला.

अंत्यविधीच्या दोन दिवसांनंतर सुभाष आणि त्यांची प्रेयसी एकत्र भेटले. त्यांनी घडला प्रकार प्रेयसीला सांगितला आणि आता आपल्याला गावापासून लांबच राहायचं असल्याचं सांगितलं. मात्र या कृत्यामुळे तिचं ही पितळ उघडं पडणार असल्यानं तिची ही झोप उडाली. दुसरीकडे नेहमी नशेत असणारे रवींद्र घरी न परतल्याने कुटुंबीयांनी 19 डिसेंबरला ते हरवल्याची तक्रार आळंदी पोलिसांकडे दाखल केली होती. रवींद्र आणि सुभाष मित्र असल्याचं, शिवाय ते दोघे 16 डिसेंबरच्या रात्री सोबतच असल्याचं चौकशीत समोर आलं. जर सुभाष यांचा अंत्यविधी पार पडलाय तर रवींद्र कुठे आहेत? यावरुन गावागावात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. 

मृत भावाला जिवंत पाहून बहीण अवाक्

हा तपास सुरु असतानाच सुभाष यांनी अखेर घरी जायचा अट्टाहास धरलेल्या प्रेयसीला तिच्या गावाजवळ सोडले आणि स्वतः बहिणीच्या गावात गेले. पण त्यांचा अवतार पाहता तिथल्या नागरिकांनी चोर समजून त्यांना चोप दिला. मग ओळख सांगताच, त्यांच्या बहिणीला समक्ष बोलवण्यात आलं. मृत पावलेला भाऊ जिवंत आहे, हे पाहून बहिणीला धक्काच बसला. ती तिथंच बेशुद्ध पडली. तिथूनच आळंदी पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली. अन् घडलेला प्रकार सर्वांसमोर आला. याप्रकरणी सुभाष थोरवेंना आळंदी पोलिसांनी अटक केलेली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget