एक्स्प्लोर

Pune Crime : माजलाय का? भाई म्हण; टोळीचा तरुणावर रॉडने हल्ला, पुण्यातील घटना, तिघांना अटक

रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने भाई न म्हटल्याने गुंडांच्या टोळीने जीवे मारणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या टोळीने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले आहे.

Pune Crime news :  पुण्यात गुन्ह्यांच्या (crime) संख्येत सातत्याने वाढ होत (pune) आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने 'भाई' न म्हटल्याने गुंडांच्या टोळीने जीवे मारणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या टोळीने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना खडकीतील शिवाजी पुतळ्याच्या परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आणि चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

36 वर्षीय संतोष साळवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन संकेत मारे ऊर्फ मेड्या, प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे,  सोनू मारे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबतच महेश सुरेश पवार यांच्या अशा चौघांवर खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पुण्यात सध्या अनेक टोळ्या सक्रिय आहे. त्यामुळे शहरात हल्ल्यांचं प्रमाणदेखील वाढत आहे. तक्रारदार व्यायाम करुन जीममधून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ्या चौकात त्यांच्या ओळखीतील लोक थांबले होते. त्यावेळी त्यांनी एकाला 'पप्प्या' या नावाने हाक मारली आणि त्यांची विचारणा केली. त्यावेळी सगळे आक्रमक झाले आणि तक्रारदाराच्या अंगावर धावून गेले. त्याला शिवीगाळ केली. माज आलाय का?, म्हणत त्याला आधी मारहाण केली त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला. 

तक्रारदाराचा मोबाईल फोडला...

या हल्ल्यात तक्रारदार जखमी झाला. त्यानंतर त्या तक्रारदाराचा मोबाईल देखील फोडला. या सगळा प्रकार पाहून परिसरातील लोकांनी भांडणं सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी गर्दीदेखील केली मात्र या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. वेत लोखंडी रॉड फिरवून लोकांना तुम्ही इथे थांबू नका याला आम्ही जिवंत सोडणार नाही. यावेळी परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहे. पुण्यात सध्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचं बघायला मिळत आहे. त्यात शहरात चुहा गॅंग आणि कोयता गॅंग चांगल्याच सक्रिय आहेत. कोयता गॅंगने तर शहरात धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातील अनेक परिसरात या गॅंगने दहशत निर्माण केली आहे. या आणि यासारख्या अनेक गॅंगला आळा घालण्याचं पुणे पोलीसासमोर मोठं आव्हान आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Embed widget