एक्स्प्लोर

Down Syndrome Marriage : एका 'अ'साधारण लग्नाची गोष्ट! डाऊन सिंड्रोम आजारावर मात केली अन् लग्नगाठ बांधली; कशी आहे प्यारवाली स्टोरी?

पुण्यातील अनन्या सावंत आणि विघ्नेश कृष्णस्वामी या डाऊन सिंड्रोम असलेल्या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे आणि तेही आता सुखी संसाराचे स्वप्न रंगवत आहेत.

Down Syndrome Marriage : लग्न, जोडीदार, कुटुंब (Down Syndrome Marriage) अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात प्रचंड महत्त्वाच्या असतात. त्यात मुलं वयात आली की लग्नाची चिंता प्रत्येक पालकांना असते. यातच मुल गतिमंद असेल तर तिचं किंवा त्याचं आयुष्य़ कसं पुढे जाईल? जगाशी लढण्यासाठी ही गतिमंद म्हणजेच विशेष मुलांचं भविष्य काय असेल, याची चिंता प्रत्येकच पालकाला असते. मात्र याच सगळ्या अडचणींना तोंड देत पुण्यातील अनन्या सावंत आणि विघ्नेश कृष्णस्वामी या डाऊन सिंड्रोम असलेल्या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे आणि तेही आता सुखी संसाराचे स्वप्न रंगवत आहेत. प्रेम सर्व अडथळ्यांना पार करते, ही म्हण या दोघांनीही खरी ठरवली आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचा दावाही केला जात आहे. 

दोघे कसे भेटले?

5 जुलै रोजी पुण्याच्या बावधनमध्ये 500 नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. अनन्या ही 21 वर्षांची असू वाकड येथील सनशाईन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका आहे तर विघ्नेश दुबईतील एका हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसर आहे. विघ्नेशचं स्पेशल असलेल्या लोकांसाठी विवाहाच्या साइटवर नोंदणी केली होती आणि तेजस्विता यांच्याशी संपर्क साधला होता. 2022 मध्ये व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबे जोडली गेली. अनन्या आणि विघ्नेश यांची एकमेकांशी ओळख झाली विघ्नेशचे कुटुंब भारतात आले आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याचा साखरपुडा केला.

सिरीयल पाहून तिलाही लग्न करावं वाटलं...

तिचे पालक सांगतात, तिला सगळ्या गोष्टी करायला आवडायच्या. ती 20 वर्षांची झाली तेव्हा तिने तिच्या आवडत्या हिरो सोबत लग्न करायची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी आम्ही चिंतेत पडलो. मात्र हिच्या आयुष्यात हिला सांभाळणारा कोणीतरी मिळेल का याचा विचार करत होते. त्याच वेळी तिची विवाह नोंदणी केली आणि तिथेच विघ्नेश सापडला. माझ्या कुटुंबीय़ांसहित अनन्याची नवीन सुरुवात झाली. अनन्या आता तिच्या संसारात रमेल.

आई-वडिलांच्या कष्टाचं चिज केलं...

अनन्या लहान असतानाच ती स्पेशल असल्याचं कुटुंबियांना कळलं होतं. त्यावेळी अनन्याच्या वडिलांना काळजी वाटली. मात्र तिच्या आईने धीर देत वडिलांची समजूत काढली. त्यानंतर दोघांनी मिळून सामान्य़ मुलीप्रमाणे अनन्याला वाढवलं. तिचा हवं ते आणि हवं तसं करु दिलं. तिला स्वप्न पाहायला शिकवलं आणि अनन्याने त्यांच्या कष्टाचं चिज करुन सनशाईन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका बनली. 

डाऊन सिंड्रोम म्हणजे काय?

डाऊन सिंड्रोमला ट्रायसोमी 21 असेही म्हणतात. यात मुलांच्या शरिराची वाढ संथ गतीने होत असते. त्यांचा बौद्धिक विकास व्हायलादेखील वेळ लागतो.  चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमध्ये फरक असतो आणि  मानसिक आणि शारीरिक विकारांनी ग्रस्त असते. मात्र याच सगळ्यांना सामान्य मुलांप्रमाणेच वाढवणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात. 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget