(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांना न्याय देणार गद्दारांचा कडेलोट करणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिव संकल्प मेळावा पार पडणार आहे
Uddhav Thackeray Public meeting : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिव संकल्प मेळावा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालं आहे. शेतकऱ्यांना न्याय देणार गद्दारांचा कडेलोट करणार असं म्हणत शिवसंकल्प मेळाव्याची ठाकरे गटाकडून तयारी सुरु आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मेळावे घेणार आहेत. उद्धव ठाकरे सात जुलैला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. सात जुलैला ते सूर्या लॉन्स येथे सकाळी 11 वाजता मेळावा घेणार आहेत. शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असं असं म्हणत शिवसंकल्प मेळाव्याची ठाकरे गटाकडून तयारी सुरु आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष तयारी सुरु आहे. आपली ताकद ज्या ठिकाणी आहे तिथे उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांची मिळावे घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा रणसंंग्राम संपला आता विधानसभेची रणधुमाळी
दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंंग्राम संपला आहे. यामध्ये महाविका आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीच्या जागाला 31 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका भाजपला बसला आहे. दरम्यान, आता पुढच्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमवीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचींना वेग आला आहे. गाठीभेटी, दौरे सुरु झाले आहेत. या निवडणुकीत देखील चांगलं यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहेत.
उद्धव ठाकरेंची सात जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट सक्रिय झाला आहे. उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा सुरु करणार असल्याची माहिती मिळत आहे. अशातच येत्या सात तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा मेठावा पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ठिकठिकाणी फ्लेक्स लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार अशा आशयाचे ठाकरेंचे पोस्टर व्हायरल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: