एक्स्प्लोर
एफआरपीचं आंदोलन चिघळलं, साखर कारखान्यांची कार्यालयं पेटवली
सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंसक आंदोलन सुरू केलं आहे. आज सकाळी वाळवा तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि घोगाव येथील क्रांती साखर कारखान्यांच्या कार्यालयांना पेटवून दिले.
सांगली : उसाच्या एफआरपीचे आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळले आहे. एकरकमी एफआरपीसाठीने साखर कारखान्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल सुरू केला आहे. सांगली सह शेजारच्या कर्नाटक राज्यातील चार साखर कारखान्यांच्या नोंदणी कार्यालयांना टाळे ठोकत आंदोलन सुरू केले आहे. तर एकरकमी साठी वाळवा तालुक्यातील दोन साखर कारखान्याची कार्यालयं पेटवून देण्यात आली आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली
तब्बल दोन महिन्यांनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा केली. मात्र हा एफआरपी एकरकमी न देता पहिली उचल म्हणून 2300 रुपये जमा केले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याविरोधात सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंसक आंदोलन सुरू केलं आहे. आज सकाळी वाळवा तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि घोगाव येथील क्रांती साखर कारखान्यांच्या कार्यालयांना पेटवून दिले.
कारखाने चालू देणार नसल्याचा इशारा
तर सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे आंदोलन केले आहे. म्हैसाळ मधील मोहनराव शिंदे आणि सांगलीच्या दत्त इंडिया साखर कारखान्याच्या नोंदणी कार्यालयांना टाळे ठोकले .त्यानंतर स्वाभिमानीने शेजारच्या कर्नाटक राज्यातील कागवाड येथील शिरगुप्पे आणि शिवशक्ती शुगर कारखान्याच्या नोंदणी कार्यालयांना टाळे ठोकले .तसेच याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत कारखानादारांनी मान्य केलेलया कायद्यानुसार एकरकमी एफआरपी दिला पाहिजे आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कारखाने चालू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर 2300 रुपये जमा
यंदाच्या ऊस हंगामात एफआरपीसाठी झालेल्या आंदोलनानंतर सांगली -कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी अधिक २०० रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र आता कारखानदारांकडून साखरेला भाव नसल्याने एकरकमी एफआरपी देने परवडत नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. दोन महिन्यानंतर शुक्रवारी उसाची पाहिली उचल म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2300 रुपये जमा केले आहेत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. एकरकमीचं एफआरपी मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. तर आता पुन्हा एफआरपीच्या मागणीसाठी आंदोलन पेटणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement