एक्स्प्लोर
खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
हिंगोली : हिंगोलीमध्ये खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन, बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 35 जण जखमी झालेत. जखमींवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कळमनुरीजवळील माळेगाव परिसरात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी ही खासगी बस नांदेडहून हिंगोलीकडे येत होती. यावेळी कळमनुरी जवळील माळेगाव फाट्यावर या बसला ट्रकने समोरुन धडक दिली. या अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील 6 ते 7 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement