एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजपनंतर संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव : सूत्र

संजय राठोडांमुळे पक्षाचं काम करण्यात स्थानिक पातळीवर अडचण येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहे. यावर पक्षप्रमुख म्हणून काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई : एकीकडे भाजपकडून वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकीयांचाही दबाव वाढताना दिसत आहे. विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 मार्चपासून विधीमंडळाचं अधिवेशन सुरु होतंय, त्याआधी राठोडांचा राजीनामा घेण्याबाबत भाजप आग्रही आहे.

विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी राठोडांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. या संदर्भात एक पत्र लिहिले असून त्यामध्ये संजय राठोड यांच्याकडून काम होत नसल्याच्या तक्रारी देखील असून गेल्या पाच वर्षात पक्ष संघटनेसाठी कोणतेही काम गेली पाच वर्षात करण्यात आले नाही.

संजय राठोडांमुळे पक्षाचं काम करण्यात स्थानिक पातळीवर अडचण येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहे. यावर पक्षप्रमुख म्हणून काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी कोणाचा दबाव

खासदार

कृपाल तुमाने, रामटेक भावनाताई गवळी, वाशिम यवतमाळ प्रतापराव जाधव, बुलढाणा

आमदार 

आमदार संजय रायमुलकर, मेहकर आमदार संजय गायकवाड,बुलढाणा आमदार नितीन देशमुख, बाळापूर आमदार गोपीकिशन बाजोरिया, वि प सदस्य आमदार विप्लव बाजोरिया, वि प सदस्य आमदार आशीष जयस्वाल रामटेक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष

भाजपनंतर संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव : सूत्र

संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नाही- अतुल भातखळकर

संजय राठोड  यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे, मग हे सरकार कसली वाट पाहतय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे. संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नाही, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

भाजपनंतर संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव : सूत्र

संजय राठोड यांनी स्वत: राजीनामा द्यावा- तृप्ती देसाई

संजय राठोड यांनी स्वत: राजीनामा देणे गरजेचं आहे. फोटो, ऑडियो क्लिप्स समोर आल्या आहेत, पोहरादेवी शक्तीप्रदर्शन या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे. उद्धव ठाकरे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मान राखून संजय राठोड यांनी स्वत: राजीना दिला पाहिजे, असं भूमात ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही देखील आक्रमक होऊन आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Pooja Chavan Death Case: वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युलाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
"कामाच्या बहाण्यानं घरी बोलावलं आणि बेडरुममध्ये..."; बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप, FIR दाखल
Embed widget