(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prashna Maharashtrache LIVE : प्रश्न महाराष्ट्राचे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी खास बातचित
Prashna Maharashtrache LIVE Updates : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संवाद साधला आहे.
LIVE
Background
Prashna Maharashtrache LIVE Updates : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.
अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.
राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग
या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.
दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.
कुठे पाहाल कार्यक्रम?
हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
Hasan Mushrif :दिल्लीच्या धरतीवर राज्यांतील शाळांचा विकास करणार
दिल्लीतील शाळांच्या धरतीवर राज्यातील शाळांचा विकास केला जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. दिल्लीमध्ये ज्या प्रकारे सरकारी शाळांमध्ये शिक्षण दिलं जातं, सुविधा दिल्या जातात, त्याच प्रकारच्या सुविधा या राज्यातील सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणामध्ये अडथळा आला होता, आता त्यासाठी सर्व ठिकाणी ऑनलाईन, डिजिटल शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आधी मुलांचा कॉन्व्हेंटच्या शाळांकडे जाण्याचा कल जास्त होता, अलिकडे तो बदलत असल्याचं दिसत आहे, सरकारी शाळा चांगल्या होत आहेत, या शाळांतील पटसंख्या वाढताना दिसत आहे.
Hasan Mushrif : राज्यातील महिला सुरक्षित आहेत
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास झाला असून त्यांच्या माध्यमातून चांगल्या सोई ग्रामीण महिलांना देण्यात येत आहेत. 15 व्या वित्त आयोगाचा निधी हा प्राथमिक शाळा आणि नंतर उपकेंद्र आरोग्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर खर्च करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण महिलांचे आरोग्य सुधारेल
Hasan Mushrif : गावांचा विकास झाला
ग्रामीन विकासामध्ये 28 हजार ग्रामपंचायची आहेत. दरवर्षी आपण यासाठी 25 हजार कोटींचा निधी देतो. त्यासाठी 50 टक्के निधी पाणी, घनकचरा अशा गोष्टींसाठी आणि 50 टक्के निधी हा रस्ते आणि इतर मूलभूत गोष्टींसाठी वापरायचा आहे. पण आता गावं चांगली होतायत. गावांचा विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले.
Hasan Mushrif : शिक्षकांच्या भरत्यांचे सामान्यीकरण होणार
ग्रामीण भागात आणि आदिवासी, रिमोट एरियामध्ये काम करण्यास शिक्षक तयार होत नाहीत. मग या क्षेत्रातल्या मुलांच्या शिक्षणाचे काय? त्यासाठी आम्ही शिक्षक भरत्यांचे सामान्यीकरण करणार असून, ऑनलाईन पद्धतीने शिक्षक भरती करण्यात येणार आहे.
Hasan Mushrif : येत्या दोन महिन्यात ग्रामविकास खात्याची भरतीची प्रक्रिया सुरू करणार
2017 पासून ग्रामविकास खात्यामध्ये कोणतीही भरती झाली नाही या विषयावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये सर्व सवर्गांमध्ये दोन लाख पदे रिक्त आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये आम्ही ती भरती करण्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करु