एक्स्प्लोर

Prashna Maharashtrache LIVE : प्रश्न महाराष्ट्राचे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी खास बातचित

Prashna Maharashtrache LIVE Updates : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला आहे.

LIVE

Key Events
Prashna Maharashtrache LIVE : प्रश्न महाराष्ट्राचे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी खास बातचित

Background

Prashna Maharashtrache LIVE Updates : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.

अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.

राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग

या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.

दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. 

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.

कुठे पाहाल कार्यक्रम?

हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

17:24 PM (IST)  •  27 May 2022

Chandrakant patil :  केंद्राने दोन वेळा इंधनावरील कर कमी केला, आता राज्याने करावा

धान्य, पेट्रोल-डिझेल, गॅस याच्याशी केंद्राचा संबंध आहे. त्यामुळे वेळोवेळी केंद्राने दर कमी करून सामान्य माणसांना दिलासा दिला आहे. नऊ कोटी उज्वला गॅसची कनेक्शन आहेत. त्यांना दोनशे रूपये सबशीडी देण्यात आली आहे. तर केंद्राने दोन वेळा इंधनावरील कर कमी केला आहे. आता राज्याने कर कमी करून सामान्य माणसांना दिलासा द्यावा.  कोरोना काळात 80 कोटी लोकांना रेशन मोफत देण्यात आलं, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.  

17:01 PM (IST)  •  27 May 2022

Chandrakant patil : भाजपने सतत सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवला  

भाजपने सतत सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या भोंगे आणि हनुमान चालिसासारख्या विषयांवर आम्ही सामान्य लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, यापेक्षा मुख्य प्रश्नांना भाजपकडून जास्त महत्व दिले जात आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  

16:57 PM (IST)  •  27 May 2022

Chandrakant patil :  शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत 

राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. कर्जमाफी पूर्ण झाली नाही, विम्याचा पत्ता नाही,  वेगवेगळ्या नैसर्गित आपत्तींमधील नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. याबरोबरच  ग्रामीण भागात विजेचे लोडशेडिंग सुरू आहे. शेतकऱ्यांची कनेक्शन कट करण्यात आली आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. 
  

16:51 PM (IST)  •  27 May 2022

Chandrakant patil : दर दोन-तीन वर्षातून एकदा कांद्याचा देशात तुटवडा होतो, त्यामुळे दरांमध्ये चढउतार होते 

दर दोन-तीन वर्षातून एकदा कांद्याचा देशात तुटवडा होतो. त्यामुळे दरांमध्ये चढउतार होते. कांद्याप्रमाणेच इतर धान्यांचेही तर असेच कमी-जास्त होत असतात, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

16:44 PM (IST)  •  27 May 2022

Chandrakant patil : 80 कोटी लोकांना रेशन मोफत देण्यात आलं 

धान्य, पेट्रोल-डिझेल, गॅस याच्याशी केंद्राचा संबंध आहे. परंतु, केंद्राने दर कमी करून सामान्य माणसांना दिलासा दिला आहे. 80 कोटी लोकांना रेशन मोफत देण्यात आलं.

16:39 PM (IST)  •  27 May 2022

Chandrakant patil : महागाईच्या विषयावर सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला 

महागाईच्या विषयावर सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला. केंद्राशी संबंधीत विषय आहेत, त्यासंबंधी आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Lok Sabha: ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
Kartiki Gaikwad Pregnancy News : लिटिल चॅम्पच्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
लिटिल चॅम्पच्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chandrakant Khaire : Ambadas Danve आणि मी हातात हात घालून प्रचार करणार : चंद्रकांत खैरेShriniwas Patil Loksabha : श्रीनिवास पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार!Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाणPrakash Ambedkar : वसंत मोरेंनी पुण्यात मागितला आंबेडकरांचा पाठिंबा, दोन ते चार दिवसांत निर्णय-मोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Lok Sabha: ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
Kartiki Gaikwad Pregnancy News : लिटिल चॅम्पच्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
लिटिल चॅम्पच्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज
कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीला रिंकूचा इशारा, मॅचपूर्वी न बोलताच सगळं सांगितलं
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Embed widget