एक्स्प्लोर

संभाजी भिडेंना क्लीनचिट देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील यांचा हात : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar On Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव प्रकरणी क्लीनचिट दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

Prakash Ambedkar On Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना भिमा कोरेगाव प्रकरणी क्लीनचिट दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  ज्या तपास अधिकाऱ्यानं हे क्लीनचिट दिलं आहे त्यानं सुप्रीम कोर्टात दिलेलं अॅफिडेबिट वाचलेलं नाही.  त्यात सुप्रीम कोर्टाला असं कळवलं आहे की, संभाजी भिडे आणि एकबोटे दोषी आहेत. त्यामुळं तपास अधिकाऱ्यानं कुणाच्या तरी सांगण्यावरुन क्लीनचिट दिली आहे. तपास अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात जे अॅफिडेबिट दिलेय त्यामध्ये भिडेंना दोषी ठरवलंय. आता भूमिका बदलल्यास तो तपास अधिकारीच विटनेस बॉक्समधे येईल. त्या अधिकाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या अॅफिडेबिटचा सामना करावा लागेल. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या निकषावर तपास अधिकारी आले कसे हा महत्वाचा भाग आहे. कोर्टात अजून यांचं नाव डिलिट करावं अशी कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही, तिथं विरोध केला जाणार आहे. तपासासंदर्भातील कागदपत्रे तिथं मागवली जातील. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाया पडतात. त्यामुळं लक्षात घेतलं जावं की सूत्रं कुठून हालत असतील. हा सगळा फ्रॉड आहे आणि त्याची कागदपत्रं माझ्याकडे आहेत असं शरद पवारांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीमधील दुफळी बाहेर येतेय, असं मला वाटतं,असंही ते म्हणाले.

आंबेडकर यांनी म्हटलं की,  ही सगळी साखळी आहे. सुप्रीम कोर्ट दोषी मानतं आणि तुम्ही त्यांना निर्दोष म्हणता. मात्र नाव वगळल्यानं हे प्रकरण मिटणार नाही. त्या 39 जणांनी कुणाच्या सांगण्यावरुन केलं. कुठल्याही गुन्ह्याला मायबाप असतो. हे सगळं समोर येईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपचाही यात पूर्ण रोल आहे. इथल्या कुठल्याही यशस्वीपणे सत्ता राबवायची असेल तर ज्या टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा परिचय पोलिसांना करुन दिला पाहिजे. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात अशी शिकवण दिली जाते.  दुसऱ्या बाजूच्या लोकांबद्दल ते बोलत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत

ओबीसी आरक्षणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत. जाणीवपूर्वक इमपीरिकल डेटा गोळा केला जात नाही. ओबीसी आणि बहुजन समाजाने राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद न देऊन ते शहाणे होत असल्याच दाखवून दिलंय. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आरक्षण विरोधी आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?Special Report Ajit Pawar :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget