एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास, गडकरींची कबुली
नागपुरातील एका कार्यकमात गडकरींनी नोटाबंदी, सरकारची कार्यपद्धती यावर भाष्य केलं. शिवाय रामदेव बाबांना जास्त संपत्ती जवळ ठेवू नका, असा सल्ला दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
![नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास, गडकरींची कबुली Poor Peoples Faced Problems In Demonetization Says Nitin Gadkari नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास, गडकरींची कबुली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/27201945/pune-gadkari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
नागपूर : नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात राष्ट्रीयता कारागीर पंचायतच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या अडचणींचा उल्लेख केला.
नोटाबंदीच्या काळात अनेक गरीब खुश होते. मी त्यांना विचारलं, की तुम्ही खुश का आहात का? तर नोटाबंदीचा त्रास होतोय, पण श्रीमतांच्या घरावर छापे पडत असल्याने आनंदी असल्याचं गरीब सांगायचे, असं गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी रामदेव बाबांच्या संपत्तीचा उल्लेखही केला. रामदेव बाबांना त्यांच्या नावावर कोणतीच संपत्ती न ठेवण्याचा सल्ला दिला. रामदेव बाबा अनेक वस्तू बनवतात. पाहता पाहता रामदेव बाबा यांच्या उद्योगाची उलाढाल 70 हजार कोटींच्या घरात गेली आहे. रामदेव बाबांना सांगितलं, की सामान्य लोक तुम्हाला खूप श्रीमंत समजतात. समाजात अती श्रीमंतांबद्दल चिड असते. म्हणून रामदेव बाबांनी त्यांच्या नावावर एकही रुपया ठेवलेला नाही. ते फक्त सामाजिक उद्यमशीलता करतात, असंही गडकरींनी सांगितलं.
दरम्यान या कार्यक्रमात गडकरींनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही वक्तव्य केलं. जोपर्यंत लोकं सरकारला धक्का मारुन जागं करत नाही, तोपर्यंत कोणतंही सरकार कामाला लागत नाही. सरकार बंद पडलेल्या ट्रक किंवा बससारखं असतं. जोवर तुम्ही धक्का मारत नाही, तोपर्यंत बॅटरी चार्ज होत नाही, असंही गडकरी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)