एक्स्प्लोर
Advertisement
सालगडी झाला कोट्यधीश! 8 एकर शेतीत हायटेक नर्सरी, 100 लोकांच्या हाताला मिळाले काम
सालगडी म्हणून काम करणारा शेतकरी (farmer) आता चक्क कोट्यधीश झाला आहे.
Hingoli News : सालगडी म्हणून काम करणारा शेतकरी (farmer) आता चक्क करोडपती झाला आहे. हो हे खरं आहे... एक दोन नव्हे तर चक्क आठ एकर शेत जमिनीवर नर्सरी उद्योग उभारून वर्षाकाठी सहा कोटी रुपयाची उलाढाल करणारा हा शेतकरी.. पाहूया विशेष रिपोर्ट
एकेकाळी सालगडी म्हणून काम केले
मराठवाडा विदर्भ सीमेवर वसलेल्या पानकनेरगावी राहणाऱ्या संतोष शिंदे यांची गावात वडिलोपार्जित असलेली त्यांची थोडी शेती आहे. अल्पभूधारक शेतकरी म्हणून त्यांची ओळख आणि शेतीला पाणी नसल्याने संपूर्ण शेती कोरडवाहू होती, अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने संतोष शिंदे यांनी एकेकाळी सालगडी म्हणूनही काम केले आहे. परंतु सालगडी म्हणून काम करत असताना सुद्धा आर्थिक चणचण कायम असल्याने शिंदे यांनी नर्सरी व्यवसाय करायचे ठरवले सुरुवातीला एक गुंठ शेतीमध्ये नर्सरी व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्यांनी झेंडूच्या रोपट्याचे उत्पादन घेतले आणि त्यात त्यांना आर्थिक फायदा दिसून आला आणि त्यांनी हाच व्यवसाय पुढे मोठा करायचा ठरवला.
8 एकर शेत जमिनीवर नर्सरीचा व्यवसाय
नर्सरी म्हटलं की, हक्काचं आणि मुबलक पाणी गरजेचे होते. पाणी नाही म्हणून शिंदे शांत बसले नाही. त्यांनी स्वतःच्या शेतात 150 लांबी आणि 150 रुंदी त्याचबरोबर 60 फूट खोल अशा स्वरूपाची भव्य महाकाय विहीर खोदली. विहिरीला जोरदार पाणी लागले. साडे चार लाख लिटर पाणी क्षमता असलेली ही विहीर त्यांनी बांधून काढली आणि नर्सरीचा व्यवसाय हळूहळू वाढवत राहिले. आता हा नर्सरीचा व्यवसाय तब्बल 8 एकर शेत जमिनीवर केला जातोय. या नर्सरीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत मिरची, टोमॅटो, झेंडू, पपई, टरबूज, खरबूज यासारख्या अनेक दहा ते बारा प्रजातीच्या रोपट्यांचे उत्पादन घेतले जाते. आता या हायटेक नर्सरीमध्ये एकूण 100 कामगारांच्या हाताला काम मिळत आहे
वर्षाकाठी 6 कोटी रुपयांची उलाढाल
शिंदे या व्यवसायातून वर्षाकाठी 6 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. रोपट्यांची गुणवत्ता उत्तम दर्जाची असल्याने या रोपट्यांना महाराष्ट्रासह अन्य राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे या रोपट्याची शिंदे हे घरपोच सुविधा देत असतात त्यामुळे फोन कॉल वर संभाषण झाल्यानंतर थेट रोपटे ग्राहकाच्या शेतात पाठवली जातात. या वाहतुकीसाठी शिंदे यांनी एक, दोन नाही तर चार वाहतुकीची ट्रक सुद्धा विकत घेतले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या रोपट्याना ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिंदे पार पाडतात.
सालगडी सुद्धा कोट्यवधी रुपयांचा मालक होऊ शकतो
या पद्धतीने प्रयत्नांना जिद्दीची जोड लावली तर दुसऱ्याच्या शेतात काम करणारा सालगडी सुद्धा कोट्यवधी रुपयांचा मालक होऊ शकतो हेच या मधून सिद्ध होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Nawab Malik : मलिकांची चौकशी, राष्ट्रवादी आक्रमक; पण नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन तणाव: UNSC मध्ये तातडीने चर्चा, भारताने म्हटले...
Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement