एक्स्प्लोर

Nawab Malik : मलिकांची चौकशी, राष्ट्रवादी आक्रमक; पण नेमकं प्रकरण आहे तरी काय?

ED questioned Nawab Malik : ईडीकडून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची चौकशी करण्यात येत आहे. पण ते प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या...

ED questioned Nawab Malik : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट आखला जात असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही गुंतवला असल्याचा संशय होता. त्यानंतर ईडीने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने मुंबईत छापादेखील मारला होता. ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली. सध्या ईडी कोठडीत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात 2017 मध्ये ठाणे पोलिसात पैसे उकळल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे पोलिसांनी त्यावेळी त्याला बेड्याही ठोकल्या होत्या. तेव्हापासून इक्बाल कासरकर तुरुंगात आहे. ईडीने कोर्टात सांगितले की, इक्बाल कासरकर डी गँगचा सदस्य आहे. तो लोकांना धमकावून वसूली करतो. भारतातील सेलेब्रिटींना धमकावून इक्बाल पैशांची वसूली करतो. दाऊदच्या नावाखाली तो लोकांना कोट्यवधी रुपयांना लुबाडत असल्याचेही सांगण्यात आले. 

ईडीकडून छापासत्र

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईत छापेमारी केली होती. यामध्ये दाऊदचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश होता. दाऊद आणि त्याच्याशी संबंधित मालमत्ता खरेदी करणारे, व्यवहार करणारे राजकारणी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आले होते. 

ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल 

या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने (NIA) नुकताच गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडी छोटा शकीलचा मेहुणा सलीम फळ याची चौकशी करत आहे. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सलीम फ्रूट अनेक वेळा पाकिस्तानात गेल्याचा संशय एजन्सींना आहे. तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करतो, असा ईडीचा विश्वास आहे. ईडी त्याच्या बँक खाते आणि संपत्तीची माहिती गोळा करत आहे. ईडीला संशय आहे की हे लोक खंडणी, सेटलमेंट आणि ड्रग्सद्वारे पैसे जमा करतात आणि त्याचा वापर दहशतवादी कारवाया किंवा हवालाद्वारे देशविरोधी कारवायांसाठी करतात. ईडी त्यांच्या मनी ट्रेलचा शोध घेत आहे.

अंडरवर्ल्ड अजूनही भारतात सक्रिय, ईडीच्या सूत्रांची माहिती

दरम्यान, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. याच प्रकरणी ईडीने 2 बिल्डरांना समन्स पाठवले असून, त्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहे. ईडीच्या सूत्रांनी एबीपी न्यूजला माहिती दिली की, या संपूर्ण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपींनी डिजिटल वॉलेट आणि डार्कनेटचा वापर करून पैसे इकडे तिकडे ट्रान्सफर केले आहेत. या संपूर्ण प्रणालीचा वापर 2019 च्या सुमारास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. युएईतील काही एजन्सींमार्फत हा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. खंडणी, ड्रग्ज, रिअल इस्टेट आणि सट्टेबाजीमध्ये अंडरवर्ल्ड अजूनही भारतात सक्रिय असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget